सुदान देशात निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यान संघर्ष पेटला आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या तणावाच्या स्थितीमुळे सुदानमध्ये मूळचे कर्नाटकचे ३१ आदिवासी नागरिक अडकले आहेत. या अडकलेल्या आदिवासी समाजाच्या नागरिकांना भारतात आणण्याची मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून देशात सध्या राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा तसेच मोदी सरकारवर टीका केली आहे. याच कारणामुळे सिद्धरामय्या आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यात ट्विटरवॉर रंगले आहे.

सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर काय आरोप केला?

सिद्धरामय्या यांनी सुदानमध्ये अडकलेल्या हक्की-पिक्की समुदायातील लोकांना भारतात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात नाहीयेत, असा दावा केला आहे. “हक्की-पिक्की समुदायातील लोकांना अनेक दिवसांपासून अन्न मिळत नाहीये. ते अद्याप सुदानध्येच अडकून पडलेले आहेत. भारत सरकारने त्यांना भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही,” असे सिद्धरामय्या ट्वीटद्वारे म्हणाले.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

हेही वाचा >> कर्नाटकमध्ये काँग्रेसकडून ९२ वर्षीय नेत्याला तिकीट, शेट्टर यांच्या पक्षप्रवेशासाठी बजावली होती महत्त्वाची भूिमका; जाणून घ्या शिवशंकरप्पा कोण आहेत?

हा तर बेजबाबदारपणा आहे

सिद्धरामय्या यांच्या या ट्वीटला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “या मुद्द्याचे राजकारण केले जात असून हा बेजबाबदारपणा आहे. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी परदेशातील भारतीयांना धोक्यात टाकण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही,” असे एस. जयशंकर म्हणाले.

तसेच दुसरे ट्वीट करून “तुमच्या ट्वीटमुळे मी घाबरलो. तेथे अनेक लोकांचा जीव धोक्यात आहे. या मुद्द्याचे राजकारण करू नका,” असे जयशंकर सिद्धरामय्या यांना उद्देशून म्हणाले.

हेही वाचा >> ‘वज्रमूठ’ सभा यशस्वी पण, काँग्रेसमधील नाराजी नाट्याचीच चर्चा

तुम्ही घाबरण्यात व्यस्त असाल तर…

जयशंकर यांच्या या ट्वीट्सवर सिद्धरामय्या यांनीदेखील ट्वीटच्याच माध्यमातून उत्तर दिले आहे. “तुम्ही परराष्ट्रमंत्री आहात. त्यामुळे मी तुमच्याकडे मदत मागितली. तुम्ही घाबरण्यात व्यस्त असाल तर सुदानमध्ये अडकलेल्या लोकांना भारतात परत आणू शकणारी व्यक्ती कोण आहे, हे आम्हाला सांगा,” असे खोचक भाष्य सिद्धरामय्या यांनी केले.

एस. जयशंकर यांनी अनेक ट्वीट्स करून सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी काय प्रयत्न केला जात आहे, याबद्दल माहिती दिली आहे. “सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची नावे आणि त्यांची ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक केली जाऊ शकत नाहीत. सध्या तेथील संघर्षामुळे ते अडकून पडले आहेत. तेथील दूतावास या नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे,” असे जयशंकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >> मुकुल रॉय पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर? रॉय यांचा मुलगा म्हणतो, “त्यांच्या डोक्यावर…”

रोज लागणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवावा

तर दुसरीकडे सुदानमधील भारतीय दूतावासाने तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना ही संघर्षाची स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. “सध्या येथे लूटमारीच्या घटना घडत आहे. सर्व भारतीयांना विनंती आहे की त्यांनी बाहेर पडू नये. तसेच रोज लागणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवावा. कारण येथे अशीच युद्धसदृश स्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. शक्यतो घरातच सुरक्षित राहा,” असा संदेश भारतीय दूतावासाने दिला आहे.

हेही वाचा >>“एके काळी इतरांमध्ये दहशत पसरवणारे आज स्वतः दहशतीखाली आहेत,” योगी आदित्यनाथांचा माफियांना इशारा!

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. असे असताना सिद्धरामय्या यांनी सुदानमध्ये अडकलेल्या हक्की-पिक्की समाजाच्या लोकांचा मुद्दा लावून धरल्यामुळे कर्नाटकमधील राजकारण चांगलेच तापले आहे.