Haryana Assembly Election 2556 aspirants in Congress : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणात काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला जोरदार टक्कर दिली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने हरियाणातील सर्व १० जागा जिंकल्या होत्या. मात्र २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसने यापैकी निम्म्या जागा मिळवल्या आहेत. भाजपाने १० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी पाच जागांवर त्यांचे उमेदवार जिंकले. तर काँग्रेसने ९ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी पाच जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. राज्यात काँग्रेसने जोरदार पुनरागमन केलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होईल यात शंका नाही. येत्या १ ऑक्टोबर रोजी हरियाणात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्यात भाजपा व काँग्रेसने जोरदार प्रचारही सुरू केला आहे. काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व काही राजकीय विश्लेषकाच्या मते राज्यात काँग्रेसची सत्ता येऊ शकते. त्यामुळे आगामी विधानसभेला तिकीट मिळावं यासाठी काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ चालू आहे.

काँग्रेसमधील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीला राज्यातील विधानसभेच्या ९० जागांसाठी २,५५६ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहबाद विधानसभा मतदारसंघ हा जननायक जनता पक्षाच्या ताब्यात आहे. या पक्षाचे नेते राम करण कला हे येथील विद्यमान आमदार आहेत. त्यांनी देखील काँग्रेसकडे तिकीट मागितलं आहे. तर कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहबाद विधानसभा मतदारसंघात विद्यमान जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार राम करण कला यांनी काँग्रेसचे तिकीट मागितले आहे.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे
Vote and get discount on hotel bill 10 percent discount on payment of voters on behalf of Pune Hotel Association
मतदान करा अन् बिलात सवलत मिळवा! पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सूट
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
thane vidhan sabha campaign
निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात ९४ रथांना परवानगी
Chandrapur district Cash, liquor, drugs seized,
चंद्रपूर: रोकड, दारू, ड्रग्ज जप्त

भाजपा पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर?

भिवानी महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले भाजपाचे खासदार धरमबीर सिंह यांचे भाऊ राजबीर सिंह लाला यांनी देखील काँग्रेसकडे भिवानी जिल्ह्यातील तोशाम मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट मागितलं आहे. भाजपाने लाला यांना तिकीट दिल्यास त्यांना त्यांच्या भावाच्या समर्थकांकडून पाठिंबा मिळू शकतो. धरमबीर सिंह हे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते व ते माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांचे निकटवर्तीय मानले जात होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला व भाजपाच्या तिकीटावर ही निवडणूक जिंकली.

त्याच वर्षी लाला यांनी हरियाणा विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली होती. ते त्यावेळी अपक्ष लढले. मात्र काँग्रेसचे उमेदवर किरण चौधरी यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला होता. किरण चौधरी यांनी यावर्षी जूनमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. सध्या तोशाम हा धरमबीर सिंह यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तोशामसह भिवानी-महेंद्रगडवर आपलं वर्चस्व कामय ठेवलं आहे.

हे ही वाचा >> Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अडचणीत, जमीन घोटाळा प्रकरणात राज्यपालांनी दिली चौकशीला मंजुरी

तोशाममध्ये चुरशीची लढत

धरमबीर सिंह यांचं गेल्या अनेक दशकांपासून माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या कुटुंबाशी वैर आहे. त्यामुळे तोशाममध्ये बन्सीलाल व धरमबीर सिंह यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला आहे. बन्सीलाल यांचे पुत्र सुरेंद्र सिंह यांचं २००५ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पत्नीने हरियाणाच्या राजकारणात उडी घेतली. गेल्या अनेक वर्षांमध्ये धरमबीर सिंह यांनी बन्सीलाल यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा तोशाममध्ये पराभव केला आहे. १९८७ मध्ये तर त्यांनी बन्सीलाल यांनाच पराभूत केलं होतं. २००० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सुरेंद्र यांचा पराभव केला. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सुरेंद्र तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेंद्र यांची मुलगी श्रुती चौधरी यांचा पराभव केला. त्यामुळे यंदा देखील तोशाममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

हे ही वाचा >> Samajwadi Party eyes on Maharashtra: उत्तर प्रदेशच्या यशानंतर समाजवादी पक्षाची महाराष्ट्रावर नजर; मविआकडून ‘इतक्या’ जागांची मागणी

काँग्रेससमोर तिकीट वाटपाचं आव्हान

दरम्यान, ९० जागांवर २,५५६ इच्छुक उमेदवार पाहून काँग्रेससमोरचं आव्हान वाढलं आहे. त्यामुळे तिकीट वाटपाआधी काँग्रेस एक सर्वेक्षण करणार आहे. भूपिंदर हुड्डा म्हणाले, “इच्छुक उमेदवारांच्या संख्येवरून स्पष्ट होतंय की राज्यात काँग्रेसची लाट आहे. काँग्रेसनेही सरकार स्थापनेचा निर्धार केला आहे.”

मागील विधानसभा निवडणुकीत एनडीएने ४३ जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. यामध्ये भाजपाच्या ४१, हरियाणा लोकहित पार्टी १ आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश होता. तर, काँग्रेसप्रणित यूपीएने ३२ तर इतर पक्षांनी १० जागा जिंकल्या होत्या.