Haryana Assembly Elections 2024 Political Pulse : हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यभरात सर्वच पक्षांनी राजकीय हालचाली वाढवल्या आहेत. राज्यात निवडणुकीची तयारी, मतदारसंघांची पुनर्बांधणी, प्रचार, जाहिराती, जागावाटप व तिकीटवाटपासाठीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचं राजकारण, नेत्यांकडून या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात अशा उड्या मारणं सुरू झालं आहे. राज्यात सध्या आयाराम – गयारामांची (पक्षांतर करणारे पुढारी) चर्चा होत आहे. मुळात आयाराम – गयाराम ही संज्ञा वापरण्यास हरियाणातूनच सुरुवात झाली होती. राज्यात ते चित्र अजूनही कायम आहे. अलीकडच्या काळात नेत्यांचं पक्षांतर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. फार कमी नेते एकाच पक्षात अनेक वर्षे टिकून असल्याचं पाहायला मिळत आहेत. हे नेते आपली मूळ विचारधारा, पक्षाची विचारधारा, आजवर केलेलं राजकारण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पक्ष बदलत आहेत.

बुधवारी हरियाणाच्या राजकारणात दोन नेत्यांची बरीच चर्चा झाली. तोशाम मतदारसंघाचे आमदार किरण चौधरी व शाहबादचे आमदार रामकरण काला हे दोघे कालपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. चौधरी यांनी ४५ वर्षांपासूनचं काँग्रेसबरोबरचं नातं संपवलं आहे. तर जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) रामकरण काला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून अखेरपर्यंत एकाच पक्षाबरोबर राहिलेले पुढारी हरियाणात दुर्मिळ झाले आहेत.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

किरण चौधरी यांनी विधानसभा सचिवालयात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सैनी यांनी सांगितलं की “जेजेपीच्या दोन बंडखोर नेत्यांनी किरण चौधरी यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये नरवणाचे आमदार रामनिवास सुरजाखेडा व बरवालाचे आमदार जोगी राम सिहाग किरण यांचा समावेश आहे. सुरजाखेडा व सिहाग हे दोघेही आगामी काळात सत्ताधारी भाजपात प्रवेश करू शकतात.

नेत्यांच्या पक्षांतराचा जेजेपीला सर्वात मोठा फटका

नेत्यांनी पक्षांतर केल्याचा सर्वात मोठा फटका जेजेपीला बसला आहे. काला, सुरजाखेडा व सिहाग भाजपात सहभागी होणार आहेत. याशिवाय नारनौंदचे आमदार राम कुमार गौतम, उकलानाचे आमदार अनूप धनक, टोहानाचे आमदार देवेंद्र सिह बबली व गुहलाचे आमदार ईश्वरसिंह हे देखील पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलं आहे. या नेत्यांनी अद्याप तशी घोषणा केलेली नसली तर त्यांनी पक्षांतराची तयारी केल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा >> BJP Alliance in UP: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं काय चुकलं? मित्रपक्षानंच दाखवला आरसा! संजय निषाद म्हणाले…

देवेंद्र बबली दी इंडियन एक्सप्रेसला म्हणाले, “मी लवकरच माझ्या समर्थक व कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावणार आहे. या बैठकीत त्यांच्यासमोर माझ्या भविष्यातील योजनांची घोषणा करेन. मी सातत्याने माझ्या मतदारसंघात काम करत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमची ताकद सर्वांना दिसेल”. दुसऱ्या बाजूला राम गौतम व अनूप धनक यांनी किरण चौधरी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. ते विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपात सहभागी होणार की त्यानंतर हे अद्याप समजू शकलेलं नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने आयाराम-गयारामांवर विश्वास दाखवला होता

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने पक्षांतर करणाऱ्या म्हणजेच आयाराम – गयारामांवर खूप विश्वास दाखवला होता. भाजपाने हरियाणा लोकसभेच्या १० जागांवर उभे केलेले १० पैकी ३ उमेदवार हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झाले होते. उद्योगपती व माजी खासदार नवीन जिंदाल हे मार्चमध्ये भाजपात दाखल झाले होते. त्यांनी कुरुक्षेत्र मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. तर काँग्रेसचे माजी खासदार अशोक तंवर हे जानेवारी महिन्यात भाजपात सहभागी झाले होते. मात्र सिरसा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. माजी अपक्ष आमदार रणजीत चौटाला हे अलीकडेच इंडियन नॅशनल लोक दल या पक्षात सहभागी झाले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी ते भाजपात दाखल झाले. भाजपाने त्यांना हिसार मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

हे ही वाचा >> Shakti Bill Update: बदलापूर प्रकरणानंतर शक्ती कायद्याची पुन्हा चर्चा; बलात्काऱ्यांना कडक शिक्षा देणारा कायदा का रखडला?

भाजपालाही गळती

माजी केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह व त्यांचे पुत्र, त्याचबरोबर हिसारचे माजी खासदार बृजेंद्र सिंह यांनी एप्रिल महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वीरेंद्र सिंह लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. तर काँग्रेस आता बृजेंद्र सिंह यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवू शकते.

Story img Loader