Haryana Assembly Elections 2024 Political Pulse : हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यभरात सर्वच पक्षांनी राजकीय हालचाली वाढवल्या आहेत. राज्यात निवडणुकीची तयारी, मतदारसंघांची पुनर्बांधणी, प्रचार, जाहिराती, जागावाटप व तिकीटवाटपासाठीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचं राजकारण, नेत्यांकडून या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात अशा उड्या मारणं सुरू झालं आहे. राज्यात सध्या आयाराम – गयारामांची (पक्षांतर करणारे पुढारी) चर्चा होत आहे. मुळात आयाराम – गयाराम ही संज्ञा वापरण्यास हरियाणातूनच सुरुवात झाली होती. राज्यात ते चित्र अजूनही कायम आहे. अलीकडच्या काळात नेत्यांचं पक्षांतर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. फार कमी नेते एकाच पक्षात अनेक वर्षे टिकून असल्याचं पाहायला मिळत आहेत. हे नेते आपली मूळ विचारधारा, पक्षाची विचारधारा, आजवर केलेलं राजकारण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पक्ष बदलत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा