नागपूर : राज्यात सत्ताधारी पक्षाच्या विरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी हरियाणा प्रारुपाचा प्रयोग करण्याच्या चर्चा सुरू होत्या. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर यात किती यश आले हे तपासल्यास गत निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत २८ टक्के उमेदवारांची संख्या वाढली. मात्र वाढीचे कारण हरियाणा प्रारुप आहे की नैसर्गिक वाढ याबाबत मतेमतांतरे आहेत. मात्र काही ठिकाणी उमेदवारांची झालेली वाढ निश्चेतपणे शंकेला वाव देणारी ठरते .

महाराष्ट्राच्या पूर्वी हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. तेथील निवडणूक निकाल पोलपंडितांचे अंदाज चुकवणारे ठरले. सरकार विरोधी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन हे यासाठी एक कारण असल्याचे निवडणूक विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे हेच प्रारूप महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून राबवले जाईल, असा अंदाज व्यक्त केला गेला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्जाची झालेली उचल हीच बाब अधोरेखित करीत होती. परंतु अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तरीही २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या २८ टक्के अधिक असल्याचे दिसून येते.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…

राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ७ हजार ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यातील तब्बल २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतली. सध्या रिंगणात ४१४०उमेदवार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या ३२३९ होती. म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत ९०१ उमेदवार (२८ टक्के) अधिक आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबारच्या शहादा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी फक्त तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर बीडच्या माजलगाव मतदारसंघातून सर्वाधिक ३४ उमेदवार आहेत. त्यासोबतच मुंबईतील ३६ जागांवर ४२०, पुणे जिल्ह्यातील २१ जागांवर ३०३ तर नागपूर जिल्ह्यातील १२ जागांवर २१७ उमेदवार रिंगणात आहेत.

हे ही वाचा… ‘कसब्या’तील धड्यातून पुण्यात भाजपचे ‘ब्राह्मण जोडो’

नागपूर जिल्ह्यातील चित्र

नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी नागपूरमधील दक्षिण-पश्चिम वगळता सर्वच मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत उमेदवारांची संख्या वाढली आहे. दक्षिण पश्चिमध्ये कमी झाली आहे. उमरेड मतदारसंघात ही संख्या मागच्या निवडणुकीइतकीच आहे. पूर्व व उत्तरमध्ये जवळपास दुपटीने वाढली आहे. ग्रामीणमध्ये रामटेक, काटोल आणि सावनेरमध्ये मोठी वाढ आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमेदवार

मतदारसंघ२०१९ २०२४
द.प.नागपूर २० १२
दक्षिण १७ २२
पूर्व नागपूर ०८ १७
मध्य नागपूर१३ २०
पश्चिम १२ २० १२ २०
उत्तर१४ २६
काटोल १० १७
सावनेर ०८ १८
उमरेड ११ ११
हिंगणा १२ १८
कामठी १२ १९
रामटेक ०९ १७

Story img Loader