हरियाणा भाजपाच्या निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीत राज्यातील सर्व १० लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्यासाठी संभाव्य दावेदारांच्या नावांवर विचारमंथन करण्यात आले. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी राज्य भाजपाने गुरुवारी नवी दिल्लीत एक बैठक घेतली, जिथे हरियाणाच्या १० लोकसभा जागांसाठी उमेदवार ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाच्या लोकसभा निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालावर राज्य निवडणूक समितीच्या सदस्यांनी सविस्तर चर्चा करून दोन ते चार सदस्यांच्या नावांचे पॅनेल तयार करून ते याच आठवड्यात हायकमांडकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. निरीक्षकांच्या अहवालात भाजपाच्या सर्व विद्यमान खासदारांची नावे निवडणूक लढवणाऱ्या प्रतिस्पर्धी नेत्यांच्या यादीत आघाडीवर आहेत. येत्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या विद्यमान खासदाराला उमेदवारी द्यायची आणि कोणाचे तिकीट कापून नव्या चेहऱ्याला तिकीट मिळणार हे भाजपा हायकमांडने ठरवायचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा