BJP Leader Mohan Lal Badoli : हरियाणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली आणि सध्या काँग्रेसमध्ये असलेले गायक रॉकी मित्तल एका नव्या वादात सापडले आहेत. दिल्लीतील एका तरुणीने दोन्ही नेत्यांवर बलात्काराचा आरोप केला आहे. या आरोपानंतर पोलिसांनी दोघांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा ३ जुलै २०२३ रोजी हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्या रॉस कॉमन हॉटेलमध्ये घडला. त्यानंतर गेल्यावर्षी १३ डिसेंबर रोजी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी आरोपाचं खंडन केलं असून हा गुन्हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.

पीडित तरुणीने तक्रारीत काय म्हटलं आहे?

पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे की, ती दिल्लीत नोकरी करत असून ३ जुलै २०२३ रोजी ती एका मित्रासह हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला आली होती. तेव्हा तिची ओळख मोहनलाल बडोली आणि रॉकी मित्तल यांच्याबरोबर झाली. पीडितेने सांगितले की, रॉकी मित्तल यांनी तिला एका अल्बममध्ये प्रमुख भूमिकेचे काम देण्याचं आश्वासन दिलं. तर मोहनलाल बडोली यांनी सरकारी नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवलं. दोघांनी मला हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं आणि मद्य पिण्यास भाग पाडलं. त्यानंतर माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच त्यांनी माझे नग्न फोटो आणि व्हिडीओही काढले. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

High Court ordered fast tracking of Badlapur sexual assault case
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : खटल्याची जलदगतीने सुनावणी घ्या आणि तो लवकरात लवकर निकाली काढा, उच्च न्यायालयाचे आदेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Three arrested in rape molestation cases
बलात्कार, विनयभंगातील तीन आरोपींना अटक
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
kalyan girl sexually abused
कल्याणमधील तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तमीळनाडूतील तरूणाकडून लैंगिक अत्याचार
Kurla bus accident , police claim in court ,
कुर्ला बस दुर्घटना चालकामुळेच, संजय मोरेच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांचा न्यायालयात दावा
Chinmoy Das bail rejected
हिंदू नेते चिन्मय दास यांना जामीन देण्यास नकार, बांगलादेशातील चितगाव न्यायालयाचा निर्णय
Rape in surat
शेअरचॅटवरील मित्राला मुंबईत भेटायला आली अन् नराधमानं गाठलं, पाच तासांत तीनवेळा बलात्कार; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

हेही वाचा : अमित शाह यांचा ठाकरे व शरद पवार गटावर हल्लाबोल; जुन्या मित्रांसाठी भाजपाचे दरवाजे बंदच, पक्षाची भूमिका स्पष्ट

कोण आहेत मोहन बडोली?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणात भाजपाला मोठा फटका बसला होता. २०१९ च्या तुलनेत पक्षाच्या जागा निम्म्यावर आल्या होत्या. त्यानंतर भाजपाकडून राज्यातील नेतृत्वात मोठे फेरबदल करण्यात आले. विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या जागी मोहनलाल बडोली यांची प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचा ब्राह्मण चेहरा असलेल्या बडोली यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला आणि भाजपाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले मोहनलाल बडोली २०१९ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले. त्यांनी राय विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जय तीरथ यांचा दोन हजार ६६३ मताधिक्याने पराभव केला. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बडोली भाजपाचे पहिलेच आमदार होते. राजकारणात येण्यापूर्वी बडोली हे कापड विकण्याचा व्यवसाय करत होते. सोनीपतजवळील बहलगडच्या कापड बाजारात त्यांचे दुकान होते. १९९५ मध्ये बडोली यांची मुरथलच्या मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. २००० मध्ये हरियाणात राष्ट्रीय लोक दल पक्षाचे सरकार होते, त्यावेळी बडोली हे मुरथल येथून जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकणारे भाजपाचे पहिले नेते ठरले.

२०२० मध्ये भाजपाने मोहनलाल बडोली यांची सोनीपतच्या जिल्हाध्यपदी नियुक्ती केली. पुढच्याच वर्षी त्यांना सरचिटणीसपदी बढती मिळाली. त्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये बडोली यांचा समावेश करण्यात आला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना भाजपाच्या निवडणूक समितीत स्थान देण्यात आलं. सोनीपतचे विद्यमान खासदार रमेश चंद्र यांचे तिकीट कापून पक्षाने बडोली यांना लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेस उमेदवार सतपाल ब्रह्मचारी यांनी जवळपास २२ हजार मताधिक्याने त्यांचा पराभव केला. उमेदवारी अर्ज सादर करताना आपल्याकडे १६ कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती बडोली यांनी निवडणूक आयोगाला दिली होती.

हेही वाचा : Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?

रॉकी मित्तल कोण आहेत?

रॉकी मित्तल ऊर्फ जय भगवान हे हरियाणातील प्रसिद्ध गायक आहेत. गेल्या १४ वर्षांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर २०० हून अधिक गाणी गायली आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी २० हून अधिक गाणी गायल्याचा दावा मित्तल यांनी केला आहे. यातील बहुतांश गाण्यांमधून त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. २०१६ मध्ये मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांनी भाजपाच्या प्रचार सल्लागारपदी मित्तल यांची नियुक्ती केली होती. २०१७ मध्ये एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने त्यांच्यावर गुडगावमधील कार्यक्रमात कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप केला. या आरोपानंतर भाजपाने तातडीने मित्तल यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

मात्र, त्यानंतर लवकरच मित्तल यांना मुख्यमंत्री कार्यालयात स्थान मिळालं. विशेष जनसंपर्क विभागात प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, तीन वर्षांनंतर २०२० मध्ये मित्तल यांना पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयातून काढून टाकण्यात आलं. दरम्यान, “शेतकऱ्यांविरुद्ध गाणी करण्यास नकार दिल्यामुळे भाजपाने माझी हकालपट्टी केली”, असा दावा मित्तल यांनी त्यावेळी केला होता. मात्र, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला.

“मित्तल यांचे मुख्यमंत्री कार्यालयातील वर्तन चुकीचे होते म्हणून त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले”, असं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. भाजपामधून हकालपट्टी झाल्यानंतर रॉकी मित्तल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी काँग्रेसचे राज्यसभा खासदार रंधीर सिंग सुरजेवाला यांच्याबरोबर एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मित्तल यांनी राहुल गांधी यांची माफी मागणारं गाणंदेखील म्हटलं होतं. त्यांच्या या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, एका तरुणीने रॉकी मित्तल आणि मोहनलाल बडोली यांच्यावर सामूहिक बलात्काराचे आरोप केल्यानंतर पोलिस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader