काँग्रेस आणि त्यांचे बंडखोर आमदार कुलदीप बिष्णोई यांच्यातील वाकयुद्ध अधिकच चिघळत चालले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर बिष्णोई यांनी पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेसने त्यांना पक्षातील सर्व पदांवरून काढून टाकले होते. पक्षाने केलेल्या कारवाईनंतर बिष्णोई यांनी पक्षातील प्रतिस्पर्धी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवत त्यांना जाहीर उत्तर देण्यास सुरवात केली आहे. ‘द इंडियन एक्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत बिष्णोई यांनी भुपेंद्रसिंग हुड्डा यांचे निकटवर्तीय उदय भान यांची हरियाणा काँग्रेस अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही एक ‘आपत्ती’ असल्याचे म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर देत उदय भान म्हणाले की ” जे त्यांच्या मतांची कदर करत नाहीत त्यांना मतदार थप्पड मारतात. आता २०२४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणाला थप्पड मिळते ते आपण पाहू” . हरियाणा प्रदेशाध्यक्ष पदी उदय भान यांची निवड झाल्यापासून बिष्णोई नाराज होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा