Maharashtra Elections : ८ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांचे निकाल लागले. हरियणात काँग्रेस जिंकणार असे अंदाज सगळ्या एक्झिट पोल्सनी वर्तवले होते. मात्र सगळे अंदाज फोल ठरवत हरियाणात भाजपाने बाजी मारली. भाजपाला हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ( Maharashtra Elections ) आजच जाहीर झाली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ( Maharashtra Elections ) होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. याआधी सोमवारी काँग्रेस नेत्यांची एक बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या दिग्गजांना पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.

महाराष्ट्रातील दिग्गजांना राहुल गांधीचा सल्ला काय?

सोमवारी दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना हरियाणाच्या निकालातून शिका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ( Maharashtra Elections ) वेळी पाय जमिनीवर ठेवा असं बजावलं आहे अशी माहिती समोर आली आहे. अतिआत्मविश्वासामुळे सत्ता हातातून जाते, महाराष्ट्राच्या बाबतीत ही चूक करु नका. हरियाणात दुधाने पोळल्याने आता राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना ताकही फुंकून पिण्याचा सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे. तसंच प्रत्येक पाऊल उचलताना काळजी घ्या असंही राहुल गांधींनी या बैठकीत बजावल्याचं कळतं आहे.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
Sharad Pawar claims that the grand alliance plans are possible but people want change print politics news
महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच

झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पुढच्या महिन्यात

काँग्रेससह इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखण्यात बऱ्याच अंशी यश मिळवलं. त्यानंतर काँग्रेस पक्ष हरियाणा आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेल्या निवडणुकीला सामोरा गेला होता. तसंच आता आज जाहीर झाल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या निवडणुका ( Maharashtra Elections ) पुढच्या महिन्यात पार पडत आहेत. या दरम्यान राहुल गांधी यांनी आस्ते कदमचा सल्ला काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणुकांना सामोरे जाताना अतिआत्मविश्वास बाळगू नका, पाय जमिनीवर ठेवा असं राहुल गांधींनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितलं आहे.

हे पण वाचा- Baba Siddique : बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या, राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “ही घटना…”

महाविकास आघाडीची लोकसभेला चांगली कामगिरी

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे ज्यामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे तीन पक्ष एकत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी ३१ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. लोकसभेत चांगलं यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र राहुल गांधींनी आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ( Maharashtra Elections ) पार्श्वभूमीवर हुरळून न जाण्याचा आणि हरियाणाच्या निकालातून शिकण्याचा सल्ला दिला आहे.