Haryana Election Results 2024 Congress high command unhappy with Bhupinder Hooda : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. भाजपाने राज्यातील ९० पैकी ४९ जागा जिंकत बहुमताचा टप्पा पार केला आहे. तर, काँग्रेसला राज्यात ३७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा (Haryana Election) हा निकाल अनेकांसाठी अनपेक्षित होता. बहुतेकांनी काँग्रेस ही निवडणूक जिंकेल असे अंदाज वर्तवलेले असताना भाजपाने ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांवर वरिष्ठांची खप्पामर्जी झाली आहे. अशातच या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी, चुका शोधणे व सुधारण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी एक उच्च-स्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती पक्षांतर्गत वाद, ईव्हीएमवरून होत असलेल्या आरोपांची पडताळणी देखील करणार आहे. ईव्हीम मशीनमध्ये व मतांच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे. त्यांनी सात मतदारसंघांमधील मतदानाची आकडेवारी उदाहण म्हणून सादर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाची चव चाखल्यानंतर आता काही काँग्रेस नेत्यांनी सल्ला दिला आहे की पक्षाने आगामी दोन राज्यांच्या (महाराष्ट्र व झारखंड) विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावं. तसेच ईव्हीएमवर अती लक्ष देणं थांबवावं. त्याऐवजी, पराभवाची खरी कारणं शोधण्याचाही सल्ला दिला गेला आहे.

हे ही वाचा >> तुकडेबंदी कायद्याचा भंग करून झालेले जमीन व्यवहार नियमित, राज्य सरकारचा निर्णय

भूपिंदर सिंह हुड्डांना काँग्रेसच्या दिल्लीतल्या चिंतन बैठकीचं निमंत्रण नव्हतं

हरियाणामधील (Haryana Election) या पराभवानंतर काँग्रेसचे नेते, माजी अध्यक्ष व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसची चिंतन बैठक बोलावली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी हरियाणातील स्थानिक नेत्यांवर, राज्य पातळीवरील नेत्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यातील काही स्थानिक नेत्यांनी पक्षाऐवजी वैयक्तिक हितांना प्राधान्य दिल्यामुळे आपल्याला हा पराभव बघावा लागला आहे. या बैठकीला राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान, भूपेंद्रसिंह हुड्डा, काँग्रेसचे हरियाणा प्रभारी दीपक बाबरिया, हरियाणा पर्यवेक्षक अशोक गहलोत आणि अजय माकन उपस्थित होते. ही चिंतन बैठक अवघ्या अर्थ्या तासांत आटोपली. या बैठकीतून काहीच साध्य झालं नाही. तसेच, ज्या भूपिंदरसिंह हुड्डा यांनी काँग्रेसच्या हरियाणामधील (Haryana Election) प्रचाराचं नेतृत्व केलं त्यांनाच या बैठकीला बोलावण्यात आलं नव्हतं.

हे ही वाचा >> रायगड महायुतीमधील मतभेद उघड, भाजपच्या खासदार – आमदारांची लाडक्या बहिण कार्यक्रमाकडे पाठ

पराभूत उमेदवारांचा भूपिंदर हुड्डांवर संताप, हायकमांडकडे केली तक्रार

हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Election) पराभूत झालेल्या अनेक काँग्रेस उमेदवारांनी उघडपणे भूपिंदर सिंह हुड्डा आणि त्यांचे पूत्र तथा रोहतकचे खासदार दीपिंदरसिंह हुड्डा यांच्यावरील नाराजी जाहीर केली. काही मतदारसंघात काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवडणुकीत पडले. या बंडखोरांना भूपिंदरसिंह हुड्डा यांनी पाठबळ दिल्याचेही आरोप होत आहेत. निवडणुकीत पडलेल्या अनेक काँग्रेस उमेदवारांनी भूपिंदर हुड्डांवरील संताप व्यक्त केला आहे. भूपिंदर हुड्डांमुळेच काँग्रेस उमेदवारांची मतं कमी झाल्याचाही आरोप होत आहे. हुड्डांनी पक्षाची दिशाभूल केल्याचाही त्यांच्यावर आरोप होत आहे.

हे ही वाचा >> Samsung Strike : हजारो सॅमसंग कर्मचाऱ्यांचा महिनाभरापासून संप; अनेक बैठका निष्फळ, मागण्या मान्य करण्यास सरकार का ठरतंय अपयशी?

हायकमांडच्याही चुका

काँग्रेसच्या ओबीसी शाखेचे अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांनीदेखील पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. यादव यांचे पुत्र चिरंजीव राव हे रेवाडी विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले आहेत. यादव स्वतः या मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेवर गेले आहेत. हा मतदारसंघ चिरंजीव राव यांच्यासाठी अर्थात काँग्रेससाठी खूप सोपा होता. तरीदेखील चिरंजीव राव या मतदारसंघात पराभूत झाले. यादव म्हणाले, त्यांचं पद म्हणजे एखाद्या खुळखुळ्यासारखं आहे. त्याचा निवडणुकीत काहीच फायदा झाला नाही. तसेच वरिष्ठ नेत्यांनी हरियाणामधील (Haryana Election) काही मतदारसंघात तितका जोर लावला नसल्याचाही फटका बसला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana election results 2024 congress high command angry on bhupinder hooda after defeat asc