दयानंद लिपारे
कोल्हापूर : कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा दिवसेंदिवस चुरशीची बनली असताना त्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली आहे. अनेकदा मंत्रिपद किंवा अन्य जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असले तरी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हुलकावणी देत असल्याची हुरहूर त्यांना होती. आता पालकमंत्रीपदाला गवसणी घालण्यात यश आलेल्या हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूरच्या राजकारणातील प्रभाव वाढीस लागण्याची चिन्हे आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची शर्यत कमालीच्या चुरशीची बनली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली होती. त्यांनी त्यास नकार दिला. तेव्हा पालकमंत्री पदासाठी गृह राज्यमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात या पदावरून स्पर्धा रंगली होती. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे यावरून वाद रंगला असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी

हेही वाचा >>> अजित पवारांच्या मनासारखे झाले; भुजबळ, तटकरे यांची इच्छापूर्ती नाही

सतेज पाटील यांच्याकडे भंडारा तर हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले होते. नंतर त्यामध्ये बदल करण्यात येऊन कोल्हापूरचे पालकमंत्रीपद दुसऱ्यांदा सतेज पाटील आले. जिल्ह्यात काँग्रेस आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याच्या निकष त्यासाठी लावण्यात आला होता. कॅबिनेट आणि वरिष्ठ मंत्री असतानाही इच्छेला मुरड घालावी लागल्याचे शल्य मनी बाळगतच मुश्रीफ यांनी अहमदनगरचे पालकमंत्री पद २०२० ते २०२२ या काळामध्ये भूषवावे लागले होते.

केसरकरांना डच्चू

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात भाजप – शिवसेना शिंदे यांचे नवे सत्ता समीकरण आकाराला आले. तेव्हा चंद्रकांत पाटील समर्थकांनी दादांकडे कोल्हापूरचे पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी केली होती. पण शिंदे यांच्या मर्जीतील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सरशी झाली होती. केसरकर यांची दीड वर्षाची पालकमंत्र्यांच्या पदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली. आठवड्यातून एकदा कोल्हापुरात येऊन नवनव्या घोषणांचा सपाटा लावलेले पर्यटन मंत्री अशी त्यांच्यावर टीका केली जात होती. नव्या नियुक्तीने केसरकर यांना अल्पकाळातच डच्चू मिळाल्याने जिल्ह्यात शिंदे सेनेला शह मिळाला आहे.

हेही वाचा >>> विरोधकांकडे असलेले मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ – विनोद तावडे

जुलै मध्ये अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेऊन उपमुख्यमंत्री पद मिळवले. तेव्हा त्यांच्यासोबत गेलेले हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य या खात्याचे मंत्रीपद मिळाले. याच काळात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होणार अशी चर्चा सुरू झाली. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा कोल्हापूरचे पालकमंत्री पद येणार असे सांगितले जाऊ लागले. तेव्हा कोल्हापुरात भाजपने पालकमंत्री दीपक केसरकर यांना हटवावे अशी मागणी करून चंद्रकांतदादांसाठी राजकीय नेपथ्य रचनाही केली होती. तथापि आज राज्यात नवे पालकमंत्री निवडले गेले असून त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री पद हसन मुश्रीफ यांच्याकडे आले आहे. तर दादांकडे सोलापूर व अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुश्रिफांचे वजन वाढले

कागल विधानसभा मतदारसंघातून ५ वेळा निवडून आलेले मुश्रीफ यांनी कामगार, ग्रामविकास मंत्री, वैद्यकीय शिक्षण अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. खेरीज अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा अनुभव पदरी आहे. असा राजकीय प्रवास केलेले मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लिम चेहरा अशी त्यांची ओळख आहे. ईडीच्या छापेमारी प्रकरणाने त्रस्त झालेल्या मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत जाऊन ही पीडा बऱ्याच प्रमाणात दूर केली आहे. आधी मंत्री आणि आता कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळाल्याने त्यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन वाढीस लागले आहे. या निमित्ताने कागल मतदारसंघात मुश्रीफ यांच्याशी मुकाबला करणे हे भाजपचे स्थानिक नेते समरजितसिंह घाटगे यांना कडवे आव्हान बनले आहे. मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने जिल्ह्यात अजितदादा गटाचा विस्तार करण्याचे आव्हान मुश्रीफ यांच्यासमोर असेल.

Story img Loader