कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला असताना तुलनेने हातकणंगले मतदारसंघात हवा अजूनही तापलेली नाही. कोल्हापुरातील प्रमुख बड्या नेत्यांनी यंत्रणा सतर्क केली असून मोठ्या सभांचा फड रोज कुठे ना कुठे भरत आहे. इकडे, हातकणंगलेत स्थानिक गाठीभेटी, छोट्या बैठका यावरच प्रचार घुटमळत आहे. एकाच जिल्ह्यातील दोन मतदारसंघातील हा फरक नजरेत भरणारा आहे. या दोन्ही मतदारसंघातील लढती लक्षवेधी होत आहेत.

कोल्हापुरात काँग्रेस पक्षाकडून श्रीमंत शाहू महाराज हे प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात असलेले शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक हे सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरलेले आहेत. मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे,आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर अशा प्रमुखांनी उचललेली आहे. या प्रत्येक नेत्याने आपापल्या विधानसभा मतदारसंघात तालुकानिहाय मोठे मेळावे, सभा आयोजित करण्याकडे लक्ष पुरवले आहे. त्यातून मंडलिक यांचे शक्ती प्रदर्शन केले जात आहे. कागल येथील एका सभेत तर पालकमंत्री मुश्रीफ यांनी तालुक्यात लाखाचे मताधिक्य मिळवणार असे म्हणून विरोधकांना धडकी बसवली आहे. कोल्हापूर शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारावर जोर दिला आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

हेही वाचा – आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

शाहू महाराज यांच्या प्रचाराची मुख्य धुरा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी नेहमीच्या शैलीत प्रचाराची यंत्रणा गतिमान केली आहे. कोल्हापूर उत्तर व दक्षिण या मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव तर करवीर विधानसभा मतदारसंघात पी. एन. पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. तुलनेने जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात काँग्रेसकडे प्रभावी चेहरा नाही. राधानगरी -भुदरगड, कागल व चंदगड या मतदारसंघात काँग्रेसला दुय्यम नेतृत्वावर अवलंबून राहावे लागले आहे. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचा काँग्रेस प्रवेश, विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर, जनता दलाचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लज नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी यांच्यावर प्रचाराची भिस्त आहे. खेरीज येथे सतेज पाटील व संभाजीराजे, मालोजीराजे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा एक मोठा वर्ग आहे. तरीही या भागामध्ये महायुतीचा बड्या नेत्यांचा प्रभाव नजरेत भरणारा असल्याने काँग्रेसला येथे बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. प्राथमिक सद्यस्थितीवरून मतदारसंघाच्या उत्तरेकडील भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे तर दक्षिणेकडे महायुतीचा दबदबा दिसत आहे. या दोन्ही ठिकाणी मिळणारे मताधिक्य कोण नि कसे मोडून काढेल यावर निकालाचा कल अवलंबून असेल असे दिसत आहे.

हेही वाचा – ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी

हातकणंगलेत गतीचा अभाव

कोल्हापुरात प्रचाराने गती घेतली असताना हातकणंगलेतील हवा तापलेली नाही. शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, निवेदिता माने यांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. इचलकरंजी भाजप कार्यालयाला दोनवेळा भेट दिली असल्याने भाजपचे कार्यकर्ते प्रचारात दिसू लागले आहेत. नाराजीची धग कमी करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. महायुतीचे मित्रपक्ष अजूनही रस्त्यावर नाहीत. मेळावे, सभा यापासून प्रचार दूरच आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली असल्याने मोठी यंत्रणा उभी करणे हे आव्हान असणार आहे. त्यांनी सभांचा धडाका उडवला आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी सत्यजित पाटील सरुडकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उशिरा सुरु झालेला प्रचार आता कोठे गती घेत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना येथे महत्वाची भूमिका निभवावी लागणार आहे. आघाडीची एकजूट ही जमेची बाजू. खासदार संजय राऊत यांनी भेट दिल्याने शिवसैनिक कार्यरत होताना दिसत असले तरी अजूनही आघाडीने जोर घेतलेला नाही. येत्या काही दिवसात चित्र बदलेले दिसेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.