सुहास सरदेशमुख

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची कार्यशैली तशी मुद्दयाला मुद्दा आणि गुद्दयाला गुद्दा अशी. ३० वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करताना त्यांचे कार्यक्षेत्र होते नांदेड. नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती अशी जबाबदारी सांभाळणारे पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. २०१९ मध्ये हिंगोली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तत्पूर्वी हदगाव विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले सुभाष वानखेडे शिवसेनेचे खासदार झाले. पण पुढे त्यांनी सेना सोडली. ते काँग्रेसचे उमेदवार झाले. यामुळे नांदेडच्या शिवसेनेची धुरा वाहणारे हेमंत पाटील यांनी हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे ठरविण्यात आले. त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने खासदार पाटील यांचे शालेय शिक्षण हिंगोली जिल्ह्यात झाले होते. पण राजकीय कारकीर्द नांदेड शहरातील. २००९ मध्ये नांदेड दक्षिण हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. या मतदारसंघातून हेमंत पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. तत्पूर्वी नांदेड जिल्हा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून पाटील यांनी केलेले काम लक्षणीय मानले जाते. सामाजिक, सांस्कृतिक महोत्सव आयोजित करत हेमंत पाटील यांनी त्यांची प्रतिमा निर्माण केली.

Mahavikas Aghadi contests, Vasai,
वसईवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Parvati Assembly Constituency, Madhuri Misal Parvati,
‘पर्वती’मध्ये आमदार मिसाळांची धाकधूक वाढली?
Prakash Ambedkars Vanchit Aghadi announced Congress Khatib as its candidate from Balapur constituency
काँग्रेसच्या माजी आमदाराला वंचितकडून उमेदवारी; १० उमेदवारांची यादी जाहीर
shiv sena deputy leader vijay nahata likely to join sharad pawar ncp ahead of assembly polls
नवी मुंबईत महायुतीला धक्का; विजय नहाटांच्या हाती तुतारी ?
Badlapur candidature, fight in BJP, Badlapur,
बदलापुरात उमेदवारीवरून भाजपातच राडा, निरीक्षकांसमोरच यादीवरून कथोरे – पाटील गटात वाद
satara congress seats marathi news
साताऱ्यात वाई, कराड दक्षिण, माण मतदारसंघाची काँग्रेसकडून मागणी
Pune, Thackeray group, Mahavikas Aghadi,
पुण्यात ठाकरे गटामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

हेही वाचा- भाजपच्या वाटेवर असलेले नाशिकचे हेमंत गोडसे तूर्त शिंदे गटात

संगीत व नाट्यक्षेत्रातील त्यांच्या ओळखी तसेच शिवसेनेचा उमेदवार होण्यासाठी आवश्यक ते गुण त्यांच्यात असले तरी पहिल्या निवडणुकीत ते पाेकर्णांच्या विरोधात पराभूत झाले. पण २०१४ मध्ये त्यांनी ही जागा राखली. पुढे या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनाही शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. पण त्या पराभूत झाल्या. याच काळात हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये हेमंत पाटील यांनी दोन लाख ७७ हजार ८५६ लाखांपेक्षा अधिकची मते घेतली व ते विजयी झाले. 

नांदेड जिल्ह्यात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट बँकही हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या बँकेच्या पाच राज्यांत ७१ शाखा आहेत. ३७२ कोटींची तरलता आणि १४८० कोटी रुपयांच्या ठेवी अशी त्यांच्या बँकेची संस्थेची स्थिती आहे. हिंगोलीचे खासदार म्हणून हेमंत पाटील यांनी अलिकडेच हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याविषयीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे शासकीय निर्णय व्हावेत असे त्यांनी प्रयत्न केले. राजीनामा देण्यापूर्वी घेण्यात आलेल्या शेवटच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, नव्या सरकारकडून पूर्वी घेतलेले सर्व निर्णय रद्द केल्याने हळद संशोधन केंद्रही रखडले होते.

हेही वाचा- कल्याण लोकसभा मतदारसंघातील हिंदुत्ववादी मतांचे श्रीकांत शिंदे यांचे गणित

एकामागे एक आमदार व खासदार शिंदे गटात सहभागी होत असताना कोणतेही नवे बालंट येऊ नये असे खासदारांनी वागावे, असे त्यांच्या समर्थकांची भूमिका होती. लोकसभा मतदारसंघ सुरक्षित होण्याची संभाव्य शक्यता गृहीत धरून हेमंत पाटील यांनी हे पाऊल उचलले असावे असेही सांगण्यात येत आहे. खरे तर फूट पडल्यानंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी निष्ठा दाखवत पुन्हा पलटी मारली होती. तेव्हा त्यांनी बांगर यांच्यावर टीका केली होती. मात्र, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत हेमंत पाटील यांनीही शिंदे गटाची वाट धरली. सुरुवातीच्या काळात हेमंत पाटील हे राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जात. पण राज ठाकरे बाहेर पडल्यानंतरही शिवसेनेत राहणारे हेमंत पाटील बदलले कसे, याची चर्चा हिंगोलीमध्ये सुरू झाली आहे.