पालघरचे पहिले पालकमंत्री तथा माजी आदिवासी विकासमंत्री दिवंगत विष्णु सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला आहे. लहानपणीच राजकारणाचे मिळालेले बाळकडू, वडिलांनी केलेल्या विकास कामांमुळे जोडला गेलेला जनसमुदाय व लाभलेले पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची साथ यामुळे त्यांना लोकसभा निवणुकीत सहज विजय प्राप्त करता आला.

वडिलांची पुण्याई कामाला आली. २०१९ मध्ये वडिलांची प्रकृती खालावल्याने डॉ. हेमंत सवरा यांना विक्रमगड विधानसभेची उमेदवारी देण्यात आली, मात्र सुमारे २१ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. या पराभवातून तसेच सन २०२० मध्ये वडिलांच्या निधनानंतर न डगमगता डॉ. सावरा यांनी आपला राजकीय व सामाजिक प्रवास सुरूच ठेवला. पक्षाच्या अनेक उपक्रमांत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. कार्यकर्त्यांचा लोकसंपर्क कायम ठेवत मृदभाषी डॉ. सावरा यांनी स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी डॉ. हेमंत सावरा यांची बहीण निशा सावरा या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यावेळी प्रचार व निवडणूक व्यवस्थापनाची धुरा त्यांनी सांभाळली होती.

Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nagpur issue of Massajog Sarpanch Santosh Deshmukhs murder case Dhananjay Munde
अजित पवारांच्या पुढे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी घोषणा
Satara district, four ministers, guardian minister post
चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेंच
Eknath Shinde Devendra Fadnavis (2)
शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं डच्चू देण्याचं कारण
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र

हेही वाचा – सरपंच ते ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री; कोण आहेत मोहन चरण माझी?

हेही वाचा – राजाभाऊ वाजे (नाशिक, शिवसेना ठाकरे गट) : साधेपणा हाच चेहरा

मुंबई येथील सर जे.जे रुग्णालयाअंतर्गत असणाऱ्या ग्रँड मेडिकल महाविद्यालयात त्यांनी एमबीबीएस ही पदवी सन २००० मध्ये व ऑर्थोपेडिक विभागात पदव्युत्तर शिक्षण सन २००४ मध्ये पूर्ण केले. पालघर तालुक्यातील तलवाडा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून दीड वर्ष काम केल्यानंतर मुंबईतील नायर रुग्णालय व नंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात निबंधक (रजिस्ट्रार) म्हणून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन वर्ष काम केले. हडाणू, पालघर हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता. पण नंतर भाजपचे वर्चस्व कमी होत गेले. डॉ. सावरा यांच्यामुळे भाजपला पालघर जिल्ह्यात नवे नेतृत्व मिळाले आहे.

Story img Loader