हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी भाजपासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाने सर्व ६८ जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र तिकीट न मिळाल्यामुळे येथे भाजपामधील अनेक नाराज नेत्यांनी बंड पुकारले असून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. पक्षातील याच बंडाळीला थोपवण्यासाठी भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाला हानी पोहोचविण्याचे काम करणाऱ्या नेत्याला पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले जाईल, असा सज्जड दम येथील भाजपाने दिला आहे.

हेही वाचा >>> मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस एका मंचावर, किशोरी पेडणेकर म्हणाल्या “मी नेहमीच म्हणते की…”

भाजपाने हिमचाल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ६८ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काही विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेले नाही. याच कारणामुळे भाजपाला येथे अंतर्गत बंडाळीला तोंड द्यावे लागत आहे. येथील भाजपाच्या काही नेत्यांनी अपक्ष किंवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. नाराज असलेल्या नेत्यांमध्ये राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस वंदना गुलेरिया यांच्याही समावेश आहे. तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे भाजपाचे माध्यम सहप्रभारी असलेले प्रवीण शर्मा यांनीदेखील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते मंडी सादार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. केएल ठाकूर हे नालागर तर नरेश दार्जी हमीमपूर येथीन स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. याच कारणामुळे येथे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे गटातील बडा नेता नाराज? गिरिश महाजन यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण!

भाजपाची ‘चुकीला माफी नाही’ची भूमिका

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीला बळ मिळाल्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. पक्षातील हे बंड थोपवण्यासाठी भाजपाने कडक पवित्रा घेतला आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराच्या विरोधात भाजपाच्या इतर नेत्याने निवडणूक लढवल्यास त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले जाईल, असे हिमाचल प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी सांगितले आहे. “भाजपामधील कोणताही नेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असेल तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांना पक्षात पुन्हा ६ वर्षांसाठी प्रवेश नसेल. पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना तशी सूचना दिलेली आहे,” असे कश्यप यांनी सांगितले आहे.

Story img Loader