हिमचाल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार असं म्हटलं जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा तसेच काँग्रेसकडून आपापल्या जाहीरनाम्यात वेगवेगळी आश्वसनं देण्यात आली आहेत. २०१७ सली झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत या दोन्ही पक्षांनी यावेळी वेगळी आश्वासनं दिली आहेत. भाजपाने सध्याच्या निवडणुकीत समान नागरी कायद्याच्या अमंलबजावणीसह महिला मतदारांना आकर्षित करणारी वेगवेगळी आश्वासने दिली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून नोकरीसोबतच अन्य काही आश्वासने दिली आहे.

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेश निवडणूक : ‘चुराह’ मतदारसंघात सत्ताविरोधी लाट; भाजपासाठी निवडणूक कठीण?

Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
Murbad , Kisan Kathore, Subhash Pawar,
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग
dhananjay munde vs rajesaheb deshmukh in parli
लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!

भाजपाने २०१७ साली जंगलातील तस्करी तसेच बेकायदेशीर खाणकाम रोखण्यासाठी हेल्पलाईन स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महिलाची सुरक्षा तसेच महिलाविषयक गुन्हे कमी करण्यासाठी ‘गुडिया योजना’ लागू केली जाईल, असे सांगितले होते. २०१७ मध्ये भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात नोकरीचे आश्वासन दिले नव्हते. त्याऐवजी श्रेणी तीन आणि चार मधील नोकरभरती ही गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल, असे भाजपाने सांगितले होते.

तर सध्याच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या आकर्षक घोषणा केल्या आहेत. भाजपाने यावेळी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी विशेष समितीची स्थापना केली जाईल. तसेच राज्यातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांची चौकशी केली जाईल, ही दोन मुख्य आश्वासनं दिली आहेत. तसेच सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने सफरचंद पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मलावरील कर कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. हा कर जास्तीत जास्त १२ टक्के असेल असे, भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. असे असले तरी भाजपाने शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीविषयी कोणतेही आश्वासन दिलेले नाही.

हेही वाचा >>> ८ लाख नोकऱ्या, ३ गॅस सिलिंडर मोफत अन् बरंच काही, भाजपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

भाजपाने यावेळी आठ लाख तरुणांना नोकरी देऊ. चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब तसेच रोज १ जीबी मोफत इंटरनेट डेटा देऊ असे आश्वासन दिले आहे. भाजापाने आपल्या जाहीरनाम्यात खेडेगावत पक्के रस्ते निर्मिती करणे, नवी वैद्यकीय महाविद्यालये, फिरते दवाखान्यांची संख्या वाढवणे, याबाबातही आश्वासन दिले आहे.

दुसरीकडे काँग्रेसने २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी जिल्हास्तरावर हॉस्टेल, विधवा महिलांच्या मुलींसाठी १ लाख रुपयांचे अनुदान तसेच एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशीपचे आश्वास दिले होते. २०१७ साली काँग्रेसने पंचायत स्तरावर सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच भ्रष्टाराला थोपवण्यासाठी तक्रारनिवारण समितीची स्थापना केली जाईल, असेही भाजपाने सांगितले हेते. या निवडणुकीत शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज देण्याचेही आश्वासन काँग्रेसने दिले होते.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का! तीन दशकांपासून सक्रिय असलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा

यावेळी मात्र काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या जनतेला मोठी आश्वासनं दिली आहेत. काँग्रेसने यावेळी २.५ लाख मतदारांना आकर्षत करण्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठीही काही आश्वासनं दिली आहेत. काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या जनतेला ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज देऊ असे सांगितले आहे. तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र यात्रा घडवून आणण्यात येईल, असेही काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. काँग्रेसने तरुणांना आकर्षित करण्यासाठी ५ लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आपल्या जाहीरनाम्यात सांगितले आहे.