हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक अवघी आठवडभराव आलेली आहे. ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारची रणनीती अवलंबली जात आहे. दरम्यान सिरमौर जिल्ह्यातील पच्छाद मतदारसंघातील लढत काहीशी विशेष असणार आहे. कारण, या जागेवर दोन महिलांमध्ये लढत होणार आहे. भाजपा आणि काँग्रेसने महिला उमेदवारास निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. एवढच नाहीतर या दोन्ही महिला अगोदर एकाच पक्षात होत्या. दोघींनी आपली राजकीय कारकीर्द जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील विजयापासून सुरू केली होती.

च्यापैकी एक मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी होत हिमाचलच्या विधानसभेत पोहचल्या होत्या. तर आता दुसऱ्या उमेदवार विधानसभेत जाण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहते.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

पाच्छड मतदारसंघात प्रमुख लढत ही भाजपाच्या बंडखोर राहिलेल्या आणि आता काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या दयाल प्यारी आणि भाजपाच्या आमदार रीना कश्यप यांच्यात असणार आहे. तर उमेदवारी न मिळाल्याने या जागेवर गंगूराम मुसाफिर हे सुद्धा काँग्रेसशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पच्छादचे आमदार सुरेश कश्यप यांना शिमला लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. ते या निवडणुकीत विजयी झाले आणि खासदार बनले. त्यानंतर दयाल प्यारी यांनी पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केला. त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी बराच जोर लावला परंतु त्यांना पक्षाकडू उमेदवारी मिळाली नाही.

माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमाळ यांच्या समर्थक असणाऱ्या दयाल प्यारी यांचे सिरमौर जिल्ह्यातील भाजपामध्ये चांगले नाव गाजले होते. परंतु तेथील काही स्थानिक नेत्यांना हे खटकले आणि एकदातर मंचावरच त्यांच्याशी धक्काबुक्की झाली. प्रकरण मोठ्या नेत्यांपर्यंत गेले परंतु काहीच झाले नाही. तेव्हापासून त्यांचे भाजपाबरोबरचे संबंध बिघडत गेले.
२०१९ च्या पोटनिवडणुकीत दयाल प्यारी यांना पच्छादमधून उमेदवारी मिळाली नाही, रीना कश्यप यांना तिथून उमेदवारी देण्यात आली. रीना कश्यप हा तसा नवीन चेहरा होता. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्येही काहीशी नाराजी दिसून आली. दयाल प्यारी यांनी समर्थकांसह शिमला येथे जाऊन आपली बाजू मांडली. मुख्यमंत्री जयराम यांच्यापासून ते मंत्री महेंद्र ठाकूर यांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. कदाचित त्यांनी ऐकलंही असतं मात्र कार्यकर्त्यांचा एवझा दबाव होता की त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. रीना कश्यप यांच्या पाठीशी पूर्ण सरकार होतं आणि मंत्री महेंद्रसिंह ठाकूर हेसुद्धा निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पच्छादमध्ये तळ ठोकून होते. परिणामी दयाल प्यारी यांना पराभवला सामोरं जावं लागलं आणि रीना कश्यप विजयी झाल्या. तेव्हा दयाल प्यारी यांना जवळपास १२ हजार मतं मिळाली होती. त्यानंतर मग दयाल प्यारी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आता दोघींही समोरा-समोर –

यावेळी काँग्रेसने मागील तीन निवडणुकीत सातत्याने पराभूत होणारे पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष, माजी मंत्री गंगूराम मुसाफिर यांना उमेदवारी नाकारली आणि दयाल प्यारी यांना पक्षाकडून उमदेवारी जाहीर केली. तर भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रीना कश्यप यांनाच संधी दिली आहे. रीना कश्यप यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांचे पाठबळ आहे आणि हा त्यांचा भागही राहिलेला आहे. त्यामुळे सुरेश कश्यप हे सुद्धा रीना कश्यप यांना विजयी करण्यासाठी विशेष ताकद लावत आहेत.