हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी ६८ जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारची रणनीती अवलंबली जात आहे. हिमाचल प्रदेशात एकंदरीत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना, सर्व पक्षाचे अनेक राजकीय नेते हिमाचल प्रदेशातील ‘बाबा रुद्रू डेरा’ला भेटी देताना दिसत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशात ‘डेरा लाट’ आल्याचं चित्र आहे.

काँग्रेसचे उमेदवार आणि विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांनी अलीकडेच २ नोव्हेंबर रोजी नारी गावातील ‘बाबा रुद्रू डेरा’ला भेट दिली. यानंतर मुकेश अग्निहोत्री यांचे विरोधक व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम कुमार शर्मा आज (५ नोव्हेंबर) रुद्रू बाबांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी इतर मतदारसंघातील अनेक उमेदवारांनीही या ‘डेरा’ला भेट दिली आहे किंवा ते ‘डेरा’ला भेट देण्याच्या प्रयत्नात आहेत. हा डेरा १७५ वर्षे जुना असून याचं नेतृत्व श्री श्री १००८ सुग्रीवानंदजी महाराज (वय-९५) करत आहेत.

Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
HM Shri Amit Shah addresses public meeting in Shirala
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर इच्छुक; अमित शहा
Vote Karega Kulaba campaign to increase voter turnout print politics news
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘व्होट करेगा कुलाबा’ मोहीम; सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त अधिकाऱ्यांचा पुढाकार
Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
Uddhav Thackeray Buldhana, Buldhana meeting,
जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरतसह महाराष्ट्रात शिवरायांची मंदिरे उभारणार, बुलढाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे गरजले
maharashtra assembly election 2024 rohit pawar campaign for maha vikas aghadi candidate ajit gavhane in bhosari assembly constituency
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार

या डेराशी संबंधित ४२ वर्षीय आचार्य हेमानंद यांनी सांगितलं की, आम्ही कुणाचं भाग्य बदलू शकत नाही. आम्ही कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित नाही. जो कोणी आशीर्वाद घेण्यासाठी येतो, त्याला आम्ही नक्कीच आशीर्वाद देतो.

हेही वाचा- …अन् शरद पवारांनी थोडक्यात उरकलं भाषण, प्रकृतीचं कारण देत म्हणाले, “आज मला…”

आतापर्यंत या डेराला दिवंगत वीरभद्र सिंह, त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंह, माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्याचे कृषी मंत्री वीरेंद्र कंवर आणि राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी भेटी दिल्या आहेत. पण हिमाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जयराम रमेश मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात कधीही याठिकाणी आले नाही. मात्र, यापूर्वी ते अनेकदा येथे आले आहेत. त्यांनी या डेराला दिलेल्या भेटीचे फोटोही उपलब्ध आहेत.