आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक हिमंता बिस्वा सरमा यांनी छत्तीसगडमध्ये निवडणुकीनिमित्त भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्यातील एकमेव मुस्लीम आमदार आणि मंत्री मोहम्मद अकबर यांना लक्ष्य केले. भूपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अकबर यांनी २०१८ च्या निवडणुकीत कवर्धा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला होता. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत कवर्धा विधानसभा मतदारसंघात २.४० लाख मतदान झाले होते, यापैकी अकबर यांना १.३६ लाख मते म्हणजे जवळपास ७० टक्के मतदान मिळाले होते, तर दुसरीकडे भाजपाचा उमेदवार ६० हजार मते घेऊन दुसऱ्या स्थानी होता. २०१३ सालीदेखील अकबर यांनी कवर्धामधून निवडणूक लढविली होती, मात्र भाजपाकडून त्यांना अतिशय कमी मतांनी पराभव सहन करावा लागला होता.

कवर्धा मतदारसंघाची पार्श्वभूमी

छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात कवर्धा मतदारसंघ मोडतो. भाजपाचे राज्यातील दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांचे हे जन्मगाव आहे. अकबर यांनी यापूर्वी शेजारच्या पंडारिया (पूर्वी बिरेंद्रनगर म्हणून ओळखले जात होते) मतदारसंघातून अनेकदा विजय मिळविला होता. या ठिकाणाहून त्यांनी प्रत्येकवेळी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न

हे वाचा >> छत्तीसगडमध्ये भाजपाकडून दंगलखोर, धर्मांतरविरोधी उमेदवारांना तिकीट; काँग्रेसविरोधात हिंदुत्वाचा प्रयोग

काँग्रेसने ६७ वर्षीय अकबर यांच्यावर विश्वास टाकून त्यांना पुन्हा एकदा कवर्धा मतदारसंघासाठी तिकीट दिले आहे. मात्र, यावेळची निवडणूक जरा वेगळी आहे. २०२१ साली कवर्धा मतदारसंघात धार्मिक दंगल उसळली होती. उजव्या हिंदू संघटनेकडून विनापरवानगी यात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये तलवारी, लाठ्या-काठ्या मिरवल्या. त्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते. या दंगलीचा लाभ उचलण्यासाठी भाजपाने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. तसेच दंगलीप्रसंगी आरोपी करण्यात आलेल्या विजय शर्मा यांना या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आली आहे.

जिल्हा पंचायत सदस्य, कबीरधाम जिल्ह्याचे माजी प्रभारी आणि जिल्ह्याचे सरचिटणीस विजय शर्मा यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यामुळे दोन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. विजय शर्मा हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. कबीरधाम मतदारसंघाच्या शेजारी असलेल्या बेमेतरा मतदारसंघात इश्वर साहू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात बेमेतरा जिल्ह्यात उसळलेल्या धार्मिक दंगलीत इश्वर साहू यांचा मुलगा भुनेश्वरचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी जाहीर सभेत बोलत असताना ते म्हणाले, इश्वर साहू यांना उमेदवारी देऊन आम्ही शहीद भुनेश्वरला न्याय देण्याचा आमचा शब्द पाळला आहे.

हिमंता बिस्वा सरमा काय म्हणाले?

हिमंता बिस्वा सरमा यांनी छत्तीसगडमध्ये भाषण करताना म्हटले, “मी इथे आल्यापासून मला सतत अकबर हे नाव ऐकायला मिळत आहे. आम्ही जेव्हा उत्तर प्रदेशचा दौरा केला होता, तेव्हा आमच्या कानावर बाबर हे नाव पडत होते. मोदी जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी बाबरचा खात्मा करून राम मंदिर बांधले. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे तुम्ही बाबर, औरंगजेब, हुमायून आणि अकबर यांची नावे ऐकाल तेव्हा त्यांना ताडतोब संपवून टाका.”

हे वाचा >> निवडणुकीची घोषणा झालेल्या राज्यांत शेतीची काय स्थिती? शेतकऱ्यांच्या मतांना किती महत्त्व?  

एवढेच नाही तर हिमंता बिस्वा सरमा यांनी इस्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेवरही टीका केली. सरमा म्हणाले की, अकबर गाझातही आहे. “आमचे आसाम राज्य ईशान्य भारताच्या एका टोकाला आहे. बांगलादेशमधून काही अकबर राज्यात आले आणि आमच्या लोकांनी सहृदयपणे त्यांचे स्वागत केले. आता आसाममधील ३५ टक्के लोकसंख्येमध्ये बदल झाला आहे आणि १२ जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्याक बनला आहे. लव्ह जिहादची प्रकरणे वाढली आहेत. एक अकबर येतो आणि त्यामागून आणखी १०० अकबर येतात. या अकबरांना त्यांच्या जागेवर पुन्हा पाठवण्याचे विसरू नका, अन्यथा देवी कौशल्याचे हे राज्य अशुद्ध व्हायला वेळ लागणार नाही.

सर्व धर्मांचा आदर करणारे मोहम्मद अकबर

मोहम्मद अकबर ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षात आहेत. १९८५ साली त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसात त्यांनी सेवा दल आणि युवक काँग्रेसमध्ये काम केले. १९९० साली रायपूर ग्रामीण आणि १९९३ साली बिरेंद्रनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. यापूर्वी २००० ते २००३ या काळात त्यांनी छत्तीसगड सरकारमध्ये मंत्रिपद भूषविले होते. यावेळीदेखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला असून ते वाहतूक, गृहनिर्माण, पर्यावरण, वने आणि कायदा या खात्याचा कार्यभार सांभाळत आहेत.

अकबर यांच्या एका निकटवर्तीयाने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, “मुस्लीम असल्यामुळे अकबर यांचा विजय झालेला नाही, तर त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ते विजयी होतात. १९९० साली ते रायपूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष होते, तेव्हा मजुरांच्या मागणीवरून त्यांनी बाजाराच्या आवारात राम मंदिराचे निर्माण केले. ते हिंदू धर्माच्या प्रत्येक सणात सहभागी होतात आणि कवर्धाच्या हनुमान मंदिरात आरतीसाठी उपस्थित असतात. त्यांच्या मतदारसंघात कुणाचाही मृत्यू झाला तरी ते त्या ठिकाणी पोहोचतात आणि कुटुंबाचे सांत्वन करतात.”

आणखी वाचा >> छत्तीसगढमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री बघेल सामना?

२०११ सालच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार कबीरधाम जिल्ह्याची लोकसंख्या ८.२२ लाख एवढी आहे. ज्यामध्ये मुस्लीम समुदायाची संख्या केवळ १.४८ टक्के एवढी आहे. अकबर यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, २०१८ च्या निवडणुकीच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लक्षात येते की, त्यांना फक्त मुस्लीम मतदारांची मते मिळाली नसून सर्वच घटकांचे मतदान मिळाले आहे.

कवर्धामध्ये धार्मिक दंगल उसळल्यानंतर अकबर यांनी मतदारसंघाचा अनेकवेळा दौरा केला आणि पीडितांच्या भेटी-गाठी घेतल्या. २३ ऑगस्ट रोजी त्यांनी तिरंगा रॅली काढली. १६ ऑक्टोबर रोजी जेव्हा त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमले होते. काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी विजय शर्मा यांच्या चिथावणीखोर वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. “२०१८ साली भाजपाचा पराभव झाल्यानंतर भाजपाने नैराश्यातून हिंदू-मुस्लीम भेद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्याकडे आता इतर कोणतेही विषय उरलेले नाहीत. भाजपाने ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू केले असले तरी हे अकबर यांच्याविरोधात चालणार नाही”, अशी प्रतिक्रिया शुक्ला यांनी दिली.

Story img Loader