नागपूर : लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींची घोषणा झाली की ,विविध पक्षातील प्रभावी राजकीय नेते व त्यांच्या मतदारसंघाविषयी चर्चा सुरू होते. ‘बालेकिल्ला’ हा त्यासाठी प्रचिलत शब्द. मात्र अनेकदा मतदारांनी नेत्यांच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक. येथून विदर्भवीर म्हणून प्रसिद्ध असलेले जांबुवंतराव धोटे, राज्यसभेचे उपाध्यक्ष व रिपाईचे दिग्गज नेते बॅ, खोब्रागडे, नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार अशा कितीतरी दिग्गजांना नागपूरकरांनी लोकसभेत पराभूत केले. सध्या लोकसभेसाठी तिसऱ्यांदा रिंगणात असलेले भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनाही १९८५ च्या विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला होता.

नागपूरमध्ये लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिलला आहे. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारही धडाक्यात सुरू आहे. काँग्रेसने अद्याप येथून उमेदवार जाहीर केला नाही. पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर सहमती झाली असली तरी अद्याप त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे गडकरींच्या विरोधात काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. गडकरींसारखा दिग्गज नेता पुढे असल्याने त्यांच्या विरोधात कोणी लढण्यास इच्छुक नाही, असेही भाजप समर्थक सांगू लागले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर लोकसभा निवडणुकीच्या इतिहासावर नजर टाकल्यास येथून विविध पक्षाचे अनेक दिग्गज पराभूत झाल्याचे दिसून येते.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
article pay tribute to world renowned mridangam scholar varadarao kamalakara rao
व्यक्तिवेध : व्ही. कमलाकर राव
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

हेही वाचा… जालन्यात काँग्रेसचा सावध पवित्रा

७० च्या दशकात नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात भाऊ जाम्बुवंतराव धोटे यांचा दबदबा होता. स्वतंत्र विदर्भराज्यासाठीलढा देणारे धोटे फॉरवर्ड ब्लॉकचे नेते होते व ते याच पक्षाचे १९७१ ते १९७७ या काळात नागपूरचे खासदार होते. प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचा कट्टर काँग्रेस विरोध सर्वश्रुत होता. काँग्रेस दुभंगल्यावर इंदिरा काँग्रेसची स्थापना झाल्यावर १९७८ मध्ये लोकसभा निवडणूक झाली तेव्हा धोटे यांच्या विरोधात इंदिरा काँग्रेसचे तरुण उमेदवार गेव्ह आवारी रिंगणात होते. एकीकडे प्रचंड लोकप्रियता आणि दुसरीकडे नवखा उमेदवार अशी ही लढत होती. मात्र आवारी यांनी धोटे यांचा पराभव करून पंचवीसव्या वर्षी लोकसभा गाठली होती. धोटे हे तिसऱ्या क्रमांकावर होते. याच निवडणुकीत एक आणखी दिग्गज नेते पराभूत झाले होते. त्यांचे नाव होते. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे . दलितांचे मोठे नेते म्हणून त्यांचे नाव होते. १९५८ ते १९८४ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. १९६९ ते १९७२ या काळात ते राज्यसभेचे उपसभापती होते. ते रिपाइंचे (खोब्रागडे) उमेदवार होते व त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. काँग्रेस नेते गे्ह आवारी यांंच्या नावावर भाजपचे नितीन गडकरी यांना पराभूत करण्याचीही नोंद आहे. त्यावेळी गडकरी यांचे नाव राजकारणात मोठे नव्हते १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत गडकरींना पश्चिम नागपूरमधून उमेदवारी मिळाली होती. त्यांच्या विरोधात आवारी काँग्रेसकडून रिंगणात होते. गडकरींपेक्षा आवारींचे नाव राजकारणात मोठे होते. आवारी यांनी गडकरी यांचा २१ हजार ५५२ मतांनी पराभव केला होता. आज गडकरी भाजपचे दिग्गज नेते आहेत. त्यांनी नागपूरची लोकसभेची जागा दोन वेळा दोन लाखांहून अधिक मतांनी जिकंली आहे हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा… मुद्दा महाराष्ट्राचा… कोकण : सागरी, ग्रामीण आणि शहरी आव्हाने…

नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर यांच्याही पदरी लोकसभा निवडणुकीत पराभव आला. कुंदाताई या महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष बॅ. शेषराव वनखेडे यांच्या कन्या. १९९६ ते ९७ या काळात त्या नागपूरच्या पहिल्या महिला महापौर होत्या. एक सुशिक्षित व सुसंस्कृत महिला नेत्या अशी त्यांची नागपुरात ओळख होती. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना रामजन्मभूमी आंदोलनामुळे भाजपने ही जागा जिंकली. नागपूरमधला हा भाजपचा पहिला लोकसभा निवडणुकीतील विजय होता. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बनवारीलाल पुरोहित हे या निवडणुकीत विजयी झाले होते. नागपूरमधून सलग चारवेळा निवडणूक जिंकणारे काँग्रेसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार यांना २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांनी २ लाख ८४ हजार मतांनी पराभूत केले होते.