केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचं कौतुक केलं आहे. मोदींच्या भाषणामुळे तरुणांमध्ये नवीन आशा निर्माण झाली. तसेच त्यांच्या भाषणामुळे गरीब, आदिवासी आणि दलितांमध्ये निर्माण केलेला विश्वास पुन्हा जिवंत झाला.

गृहमंत्री अमित शाह ट्वीट करत म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी आज आपल्या भाषणाद्वारे संसदीय कामकाजाचे सर्वोत्तम उदाहरण घालून दिलं. त्यांनी तरुणांमध्ये नवी आशा जागवली. आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी भारत हा आपल्या अमृत काळात मागे वळून बघत नाही, असा संदेश दिला.”

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या भाषणाने गरीब, आदिवासी आणि दलितांचा आत्मविश्वास द्विगुणित केला. त्यांनी (पंतप्रधान मोदी) गरीब, आदिवासी आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यांचं जीवनमान उंचावलं. “भारताच्या स्वातंत्र्यानंतर ज्यांनी अनेक दशके त्यांना वंचित ठेवलं, ते आता विश्वासाचा हा पाया हलवू शकत नाहीत,” असंही शाह अन्य एका ट्विटमध्ये म्हणाले.

पंतप्रधान मोदी लोकसभेत नेमकं काय म्हणाले?

माझ्याकडे १४० कोटी देशवासीयांच्या आशीर्वादाचं सुरक्षा कवच आहे. ज्यामध्ये कोणीही घुसू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आभारप्रदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील जनता नकारात्मकता स्वीकारू शकत नाही. ते आपल्यावर लावलेल्या “खोट्या आरोपांवर” कधीही विश्वास ठेवणार नाही.