BJP चार दिवसांपासून उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना हटवण्याची मागणी करत संसदेत गदारोळ घातला जातो आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी अदाणी प्रकरणात जे आरोप झाले आहेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं पाहिजे ही मागणी कायम ठेवली आहे. या मागणीवरुनच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ पाहण्यास मिळतो आहे. मात्र भाजपाने ( BJP ) खेळी करत विरोधकांना उत्तर दिलं आहे.
उपराष्ट्रपतींच्या विरोधातला प्रस्ताव काय?
उपराष्ट्रपतींच्या विरोधात १० डिसेंबरला प्रस्ताव आणला गेला. याबाबत जयराम रमेश यांनी असं म्हटलं आहे की राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय इंडिया आघाडीकडे कुठलाही पर्याय उरला नाही. कारण जगदीप धनकड हे सभागृहात विरोधी पक्षाला त्यांची बाजू मांडू देत नाहीत. विरोधी पक्षासाठी असं करणं योग्य नाही. त्यामुळे आम्हाला ते करावं लागलं. हे सगळं झालं असलं तरीही भाजपाने ( BJP ) जे केलं ते उत्तर ही एक खास खेळी ठरली
८ ऑगस्ट २०२४ ला काय घडलं होतं?
८ ऑगस्ट २०२४ या दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानही उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि विरोधी पक्षांत वाद झाला होता. काँग्रेसचे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत विनेश फोगाटचा विषय काढला होता. मात्र धनकड यांनी त्यांना बोलू दिलं नाही. एवढंच नाही अदाणींचा निषेध करण्यासाठी आणि त्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी प्रियांका गांधींसह अनेक काँग्रेस खासदार अदाणी-मोदी भाई भाई असा संदेश लिहिलेल्या आणि त्यांचं व्यंगचित्र असलेल्या बॅगा घेऊन आले होते. त्यावेळी संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आली. विरोधकांनी एवढी सगळ्या गोष्टी गदारोळ केल्यानंतर भाजपाने ( BJP ) शांत बसणं पसंत केलं नाही.
भाजपाने नेमकं काय केलं?
भाजपाने ( BJP ) संसदेच्या कनिष्ठ सभागृहात काँग्रेस हायकमांड आणि सोरोस यांच्यातील कथित संबंधांचा निषेध नोंदवला. तसंच भाजपाने गुरुवारीही हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर शुक्रवार आणि सोमवार अशा दोन्ही दिवशी दिवशी गदारोळ झाला. मात्र भाजपाने धनकड यांच्याविरोधात काँग्रेसने जे केलं त्याला उत्तर देत सोनिया गांधींना टार्गेट केलं. सकाळी ११ वाजता भाजपाने सोरोस यांच्या मुद्द्यावरुन लोकसभेच्या बाहेर आंदोलन केलं.
क्रमवार जाणून घ्या काय काय घडलं?
दुपारी १२ वाजता भाजपा खासदार दिलीप साईकिया यांनी आजच्या दिवसाचा अजेंडा सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची विनंती केली. १२ वाजून ७ मिनिटांनी केंद्रीय मंत्री सरबनंदा सोनवाल यांनी मर्चंट शिपिंग विधेय २०२४ मांडलं. त्यानंतर १२ वाजून ८ मिनिटांनी मनिष तिवारी यांनी या विधेयकाला विरोध करण्यास सुरुवात केली. १२ वाजून १० मिनिटांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनीही या विधेयकाला विरोध दर्शवला आणि मनिष तिवारींची री ओढली. त्यानंतर पुन्हा एकदा गदारोळ झाल्याचं पाहण्यास मिळालं. १२ वाजून १३ मिनिटांनी किरण रिजेजू यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर हे विधेयक सभागृहात सादर कऱण्यात आलं. यानंतर किरण रिजेजू उभे राहिले. त्यांनी विरोधकांची चांगलीच शाळा घेतली.