-अविनाश कवठेकर/बाळासाहेब जवळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील किती आमदारांना मंत्रीपदे मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद निश्चित मानले जात आहे. त्याचबरोबरच माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर, सुनील कांबळे यांची नावेही मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. पिंपरी-चिंचवडमधून आमदार महेश लांडगे तर जिल्ह्यातून राहुल कुल यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या आठवड्यात होईल, अशी शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची आगामी निवडणूक लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रीपद मिळणयाची शक्यता आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये पुणे आणि पिंपरीसह जिल्ह्यातील आमदार उत्सुक असले तरी मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र वापरले जाणार की, आगामी निवडणूक लक्षात घेऊन मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद दिले जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघामध्ये १२ मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार आहेत. तर उर्वरीत नऊ मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, शिक्षण संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच वर्चस्व आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवायचा असेल तर जिल्ह्यातून मंत्रीपद द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना टक्कर देणारा नेता जिल्ह्यातून मंत्रीपदाच्या शर्यतीत असेल.
सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पिंपरीतून आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांना मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात आहे. या तिघांची बलस्थाने आणि त्यांच्यापुढील आव्हाने काय आहेत, याचा मंत्रीपद देताना विचार केला जाईल. चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद होते. त्यामुळे नव्या मंत्रीमंडळात त्यांचा समावेश नक्की असल्याचे मानले जात आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातून अद्यापही महिला आमदाराला मंत्रीपद मिळालेले नाही. भाजपचे सरकार असताना मिसाळ मंत्रीपदासाठी आग्रही होत्या. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्यास शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आणि फडणवीस यांचे समर्थक सिद्धार्थ शिरोळे यांचा तर जातीय समीकरणे जुळविण्यासाठी सुनील कांबळे यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे.
दौंड मतदारसंघातून निवडून आलेले राहुल कुल यांना जिल्ह्यातून संधी मिळेल, असा अंदाज आहे. राहुल कुल यांनी २०१४ मधील निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर तर २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जिंकली होती. राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.
पिंपरीतून महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा –
नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात सत्तांतर झाले आणि सत्तेत सहभागी झालेल्या भाजपमध्ये पुन्हा एकदा मंत्रीपदासाठी भाजपमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून भोसरीचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे एकमेव नाव चर्चेत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी दोन हात करण्यासाठी मंत्रीपद देऊन लांडगे यांना ताकद दिली जाईल, असे गणित मांडले जाते.
पिंपरी-चिंचवड आणि मंत्रीपद, असे समीकरण यापूर्वी कधी चर्चेत नव्हते. अजित पवार हेच शहराचे मंत्री मानले जात होते. २०१४ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार आले, तेव्हा तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा होती. कारण, महेश लांडगे तेव्हा प्रथमच निवडून आले होते. २०१७ च्या महापालिका निवडणुका तोंडावर असताना, ‘तुम्ही महापालिका जिंकून दाखवा, मंत्रीपदासाठी तुमचा नक्की विचार केला जाईल’, असे आश्वासन आमदार जगताप व लांडगे यांना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले होते. त्यानुसार, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत अजित पवारांच्या ताब्यात असलेली महापालिका खेचून भाजपकडे आणली. त्यामुळे आपल्याला मंत्रीपद मिळेल, असे दोन्हीही आमदारांना वाटत होते. पवारांचा पराभव आणि भाजपचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी त्याच दरम्यान भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवडला घेण्यात आली. त्यावेळी पालिकेची सत्ता आणल्याबद्दल दोन्ही आमदारांचा पक्षाच्या व्यासपीठावर यथोचित सत्कार करण्यात आला. अनेक नेत्यांनी दोन्ही आमदारांना मंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. प्रत्यक्षात ती घोषणा तथा ते आश्वासन हवेतच विरले. नंतर, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेची पडझड होत असताना भोसरीतून महेश लांडगे आणि चिंचवडमधून लक्ष्मण जगताप पुन्हा निवडून आले. मंंत्री होण्याची त्यांची प्रबळ इच्छा होतीच, मात्र भाजपचे सत्तेचे गणित फिसकटल्याने इतरांप्रमाणे त्यांचाही हिरमोड झाला.
अडीच वर्षांच्या कालावधीनंतर, गेल्या आठ-दहा दिवसांत झालेल्या वेगवान घडामोडीनंतर भाजप पुन्हा सत्तेत आला. राज्य भाजपमधील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मंत्री होण्याच्या भाजपमधील इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे लांडगे यांचे एकमेव नाव शहरातून जाईल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. यात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या नावाची भर पडली आहे. दिवगंत गोपीनाथ मुंडे समर्थक असणाऱ्या खापरे यांना विधान परिषदेवर संधी देऊन पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचे पक्षवतुर्ळात मानले जाते. राज्यातील सत्तेत त्यांना संधी मिळेल. मात्र, मंत्रीपदापेक्षा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी खापरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे पक्षवर्तुळातून सांगण्यात येते.