हिमाचल प्रदेशमध्ये काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि अन्य पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री सुरेश भारद्वाज यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. भारद्वाज हे पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुरेश भारद्वाज यांच्यावर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे नगरविकास, शिक्षण आणि कायदा मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Congress and BJP both hypocrite over Situation of Dalits in India
डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत काँग्रेस व भाजपा दोघेही दुटप्पी; दलितांच्या प्रश्नांवर दोन्ही पक्ष उदासीन
Image of P P Chaudhary
One Nation One Election : तीन वेळा खासदार व RSS ची पार्श्वभूमी असलेले संसदीय समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी कोण आहेत?
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
High level committee to find new sources of income Nagpur news
राज्यासमोर आर्थिक आव्हान; उत्पन्नाचे नवे स्राोत शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिति
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा? (फोटो सौजन्य @इंडियन एक्स्प्रेस)
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?
Vijay Wadettiwar, Vijay Wadettiwar on Opposition Leader post , Opposition Leader post ,
“… तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करू”, वडेट्टीवारांचे विधान; काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून भाजपवर निशाणा

हेही वाचा – निवडणूक एका जागेसाठी पण मैदानात उतरवले ८४ आमदार १८ खासदार; भाजपाच्या पराभवासाठी कसली कंबर

७० वर्षीय सुरेश भारद्वाज शिमला मतदारसंघातून येतात. भारद्वाज यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( एबीवीपी ) या संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९७३ साली ते एबीवीपीचे राष्ट्रीय सचिव बनले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागून केलेल्या आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनांमध्ये भारद्वाज यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

कायद्याचे शिक्षण घेतलेल्या भारद्वाज यांची १९७० च्या दशकात हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या लॉ स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. शिमला बार असोसिएशचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार पाहिला आहे. १९८० ते २००३ सालादरम्यान हिमाचल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भारद्वाज यांच्याकडे देण्यात आलं.

हेही वाचा – समाजवादी ते ‘मुल्ला मुलायम’… देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे मुलायमसिंह यादव

भारद्वाज १९९० साली शिमला मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला. २००२ साली ते राज्यसभेवर निवडून गेले. खासदार म्हणून कार्यरत असताना ते विविध संसदीय समित्यांचे सदस्य होते. त्यानंतर २००७ सालापासून ते सलग तीनवेळा विधानसभेवर निवडून येत आहेत.

डिसेंबर २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री जयराम ठाकूरांच्या मंत्रिमंडळात सुरेश भारद्वाज यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे शिक्षण, कायदा, संसदीय कामकाज मंत्रालय अशी खाती देण्यात आली. तसेच, दोन वर्षापूर्वीच नगरविकास खात्याची जबाबदारीही भारद्वाज यांच्यावर सोपवली गेली.


दरम्यान, चारवेळा निवडणूक लढलेले भारद्वाज पाचव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भारद्वाज यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ गोठल्याने परभणीत ‘खान पाहिजे की बाण’ या प्रचारालाही पूर्णविराम


दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी शिमला येथे पोहचल्या आहेत. दिल्लीत होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी त्या शिमल्यात पोहचल्या आहेत. सोनिया गांधी पुढील दोन दिवस काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्या छराबडा येथील घरी राहणार आहेत.


सोनिया गांधी यांचा हा वैयक्तिक दौरा आहे. या काळात त्यांच्याकडे नेत्यांना भेटण्याचा कोणताही जाहीर कार्यक्रम नाही, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी दिली. तर, दुसरीकडे पक्षातील काही सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी 2 दिवस विश्रांती घेणार असून राज्यातील काही काँग्रेस नेत्यांच्या वन-टू-वन बैठका देखील घेऊ शकतात.

Story img Loader