भाजपाने माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज हिला नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील प्रचारातही बन्सुरी सक्रिय दिसत आहे. माझ्यावर सुषमा स्वराज यांचे संस्कार आहेत, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही,” असं ४० वर्षीय बन्सुरी स्वराज म्हणाली आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवार म्हणून बन्सुरी पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून, प्रचारादरम्यान प्रत्येक भाषणात तिने आपल्या दिवंगत आईला साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या आईची मुलगी असून, माझ्या मूल्यांना आणि कार्य नैतिकतेला आकार देण्यासाठी आईच्या प्रभाव फायदेशीर ठरला आहे, असंही इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बन्सुरी हिने सांगितले. मी राजकारणातील प्रवेशाबाबत कधीही कोणाशी चर्चा केली नसल्याचेही ती सांगते. “माझी आई आणि मी माझ्या राजकारणातील प्रवेशाबद्दल कधीही चर्चा केली नव्हती, परंतु आम्ही माझ्या कायदा क्षेत्रातील प्रवेशाबद्दल खूप चर्चा केली, कारण त्या वेळी राजकारणात येण्याचा माझा कोणताही इरादा नव्हता,” असंही तिने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा