अमेरिकेचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदाणी प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर जॉर्ज सोरोस यांच्यावर टीकेची झोड उठते आहे. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोरोस यांच्यावर टीका केली आहे. तसंच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचंही वक्तव्य समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे पी चिदंबरम यांनी?

जॉर्ज सोरोस यांनी आधीही काही गोष्टी म्हटल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टींशी मी सहमत नव्हतो. त्याचप्रमाणे आताही त्यांनी जी काही वक्तव्यं केली आहेत त्याच्याशीही पूर्णतः सहमत नाही. मात्र सोरोस यांचं वक्तव्य म्हणजे भारतात लोकशाही मार्गाने निवडलेलं सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे असं म्हणणं हे हास्यास्पद आहे असं म्हणत पी चिदंबरम यांनी भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर टीका केली आहे. कारण हे वक्तव्य त्यांनीच शुक्रवारी केलं होतं.

पुढे चिदंबरम म्हणाले की मला ठाऊकच नव्हतं की..

यानंतर चिदंबरम असं म्हणाले आहेत की मला हे ठाऊक नव्हतं की भारतातलं मोदी सरकार इतकं कमकुवत आहे की ९२ वर्षांच्या एका अमेरिकी उद्योजकाच्या म्हणण्याने ते पडेल. एखादी विदेशी व्यक्ती आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात ट्विट करतो आहे ही बाब चुकीचीच आहे. आपल्या देशात कुणाचं राज्य हवं हा सर्वस्वी जनतेचा निर्णय आहे असंही पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I did not know modi government was so congress leader p chidambaram on george soros issue scj