दतिया (म.प्र.) : मध्य प्रदेशचे कट्टर हिंदुत्ववादी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा वादग्रस्त विधाने करून स्वतःला प्रकाशझोतात ठेवत असले तरी, मिश्रांना ही बाब मान्य नाही. “मी वादग्रस्त विधाने करत नाही. माझ्यामध्ये खरे बोलण्याचे धाडस आहे”, असे मिश्रा यांनी दतिया विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान ‘लोकसत्ता’ला सांगितले.

ग्वाल्हेरपासून दीड तासांच्या अंतरावर नरोत्तम मिश्रांचा दतिया विधानसभा मतदारसंघ आहे. इथून झांशीही तासाभराच्या अंतरावर आहे. दतिया हा मिश्रांचा बालेकिल्ला. तरीही २०१८च्या विधानसभा निवडणुकीत मिश्रा केवळ अडीच हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळत मिश्रांनी दतियामध्ये आक्रमक प्रचार सुरू केला आहे. या प्रचार रॅलीमध्ये मिश्रांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले. “दतियामध्ये वेगाने विकास झालेला आहे. दतियाने आता आकाशात झेप घेतलेली आहे. इतकेच नव्हे तर हेमा मालिनीलाही इथे नाचवले आहे”, असे मिश्रा म्हणाले. दतियाच्या विकासाचे श्रेय लाटताना मिश्रांनी स्वपक्षीय खासदार हेमा मालिनी यांचा आक्षेपार्ह उल्लेख केला. पण, मिश्रांना या विधानामध्ये काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. “या विधानामध्ये चुकीचे काय आहे? मी योग्यच बोललो. इथे हेमा मालिनी नृत्य करण्यासाठी आल्या होत्या”, असे मिश्रा म्हणाले.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले

हेही वाचा – खासदार बंदी संजय कुमार यांना विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय भाजपासाठी फायदेशीर ठरेल का?

मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी कितीही वादग्रस्त विधाने केली तरी, ना त्यांना मुख्यमंत्र्यांनी रोखले ना दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाने. दतिया शहराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर भाजपचे भव्य कार्यालय असून सध्या नरोत्तम मिश्रा, त्यांचे बंधू आणि मुलाचे इथेच वास्तव्य आहे. या कार्यालयात दिवसभर वर्दळ होती, दुपारी चारनंतर मिश्रा कार्यालयात आल्यावर आवार कार्यकर्त्यांनी तुडुंब भरून गेले होते. मिश्रांच्या एका कार्यकर्त्याचे म्हणणे होते की, मिश्राजी अधूनमधून वादग्रस्त बोलतात पण, त्याचा इथल्या मतदारांवर काही परिणाम होत नाही. ते लोकप्रिय आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे!

१९९०, १९९३, १९९८ आणि २००३ मध्ये मिश्रा यांनी शेजारील डबरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यावर मिश्रा यांनी दतियाची निवड केली. २००८, २०१३ आणि २०१८ मध्ये मिश्रा दतियामधून विधानसभेवर निवडून गेले. पूर्वाश्रमीचे संघ कार्यकर्ते नरोत्तम मिश्रा हे ब्राह्मण असून कट्टर हिंदुत्ववादी आहेत. दतियामध्ये सुमारे ३५ हजार ब्राह्मण मतदार आहेत. शिवाय ठाकूर, ओबीसी आणि अनसुचित जाती-जमातींचीही मते मिश्रांना मिळतात. पण, २०१८ मध्ये मिश्रांच्या मताधिक्यामध्ये कमालीची घट झाली होती. “यावेळी मी ३५ हजार मताधिक्याने जिंकून येईन”, असा दावा मिश्रांनी केला. “२०१८ची राजकीय परिस्थिती वेगळी होती. मिश्रांना दतियाच्या ग्रामीण भागांतून कमी मते मिळाली होती. काँग्रेसने शेतकऱ्यांचे २ लाखांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. चंबळ-ग्वाल्हेर खोऱ्यात ज्योतिरादित्य शिंदेंच्या झंझावाती प्रचाराचाही परिणाम झाला. शिवाय, ब्राह्मण आणि दलितांमध्ये दंगल झाली होती. त्यामुळे दलित मते तुलनेत कमी मिळाली होती”, असे मिश्रांचे माध्यम सल्लागार बिर्जेश द्विवेदी यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – मंत्र्यावर कारवाई होताच संतापल्या, मोईत्रा यांच्यावरील आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया नाही, ममता बॅनर्जींच्या मौनाचा अर्थ काय?

दतियामध्ये काँग्रेसने पूर्वाश्रमीचे संघ प्रचारक, कडवे हिंदुत्ववादी आणि एकेकाळचे नरोत्तम मिश्रांचे घनिष्ठ अवधेश नायक यांना उमेदवारी दिली होती. ऑगस्टमध्ये नायक भाजपमधून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी स्थानिक नेते राजेंद्र भारती यांना डावलून नायक यांना उमेदवारी दिली होती. “नायक हे कमकुवत उमेदवार होते, त्यांची घोषणा झाल्यावर मिश्रांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे आनंद व्यक्त केला होता”, असे मिश्रांच्या कार्यकर्त्याने सांगितले. नायक यांच्या उमेदवारीला राजेंद्र भारतींनी तीव्र विरोध केला. अखेर दिल्लीवरून नायक यांची उचलबांगडी झाली आणि राजेंद्र भारतींना पुन्हा उमेदवारी दिली गेली. गेल्यावेळी भारतींनी मिश्रांविरोधात तगडी लढत दिली होती. त्यामुळे मिश्रा यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. “मॉर्निंग वॉक हा त्यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा असतो. सकाळी सहा वाजता पाचशे कार्यकर्त्यांचा घोळका घेऊन मिश्रा फिरायला जातात, लोकांना भेटतात. मग, दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये गावा-गावांमध्ये फिरतात. दररोज किमान दहा गावांमध्ये मिश्रा प्रचार करतात. दुसऱ्या सत्रामध्ये संध्याकाळी पाचनंतर ते शहरी भागांमधील मतदारांना भेटतात. दिवसभरात तीन टप्प्यांमध्ये मिश्रा प्रचार करत आहेत”, असे द्विवेदी यांनी सांगितले.

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केंद्र व राज्य सरकारच्या योजनांभोवती केंद्रित झाला आहे. राज्यामध्ये दोन दशके भाजपची सत्ता असून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारवर मतदार नाराज असल्याचे सांगितले जाते. हा आरोप मिश्रांनी फेटाळला. “आमच्या सरकारविरोधात कसलीही नाराजी नाही. आम्ही पुन्हा जिंकून येऊ”, असा दावा मिश्रांनी केला. चंबळ-ग्वाल्हेर विभागात केंद्रीयमंत्री नरेंद्र तोमर, ज्योतिरादित्य शिंदे, नरोत्तम मिश्रा असे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नेते आहेत. पण, “मी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही. आम्ही सगळे शिवराजसिंह चौहान यांचे अनुयायी आहोत”, अशी मिश्कील टिप्पणी मिश्रांनी केली.

Story img Loader