मोहन अटाळकर
अकोला : भारत जोडो पदयात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नव्हे तर आता ही सर्वसामान्यांची आहे. ही यात्रा थांबविल्यास त्याचे काय परिणाम होतील याची चिंता त्यांनी करावी, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे नाव न घेता दिला आहे.
हेही वाचा… भास्कर अंबेकर : राजकारणाला सामाजिक कार्याची जोड
हेही वाचा… Maharashtra News Live : राज्य, देश तसेच जगभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!
पातूर येथे गुरुवारी पहाटे भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले म्हणाले, भारत जोडो देशाच्या प्रश्नावर भाष्य करणारी यात्रा आहे. त्यामुळे तिला थांबवण्याचा प्रश्नच येत नाही. दरम्यान, बिरसा मुंडा यांनी प्रलोभन नाकारून आपल्या मातीशी इमान कायम ठेवला. सावरकरांना इंग्रजांनी पेन्शन सुरू केली, ती पेन्शन त्यांनी का स्वीकारली असा प्रश्न खा. राहुल गांधींनी विचारणे गुन्हा नाही, असे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले. राहुल गांधींनी विचारलेला प्रश्न हा जनतेचा प्रश्न आहे, जनतेने विचारलेल्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावे, ते जनतेपेक्षा मोठे नाहीत, अशी टीका पटोले यांनी केली.