पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला हे वाटत नाही की मुस्लिम मुलांनी शिक्षण घ्यावं. त्यांच्यावर कायम अन्यायच व्हावा असं या सरकारला वाटतं. भाजपाच्या एका खासदाराने सांगितलं चाकूचा उपयोग फक्त भाजी कापण्यासाठी करू नका वेळ पडल्यास त्याने गळाही चिरा. मुस्लिमांच्या विरोधात भडकवणारं, चिथावणी देणारंच हे वक्तव्य होतं असं असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत म्हटलं आहे. त्याचप्रमाणे हिंडेनबर्ग भारतात झालं असतं तर UAPA लागला असता असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
काय म्हटलं आहे असदुद्दीन ओवैसी यांनी?
बिल्कीस बानो मुस्लिम नसती तर एव्हाना तिला न्याय मिळाला असता. बिल्कीस बानो मुस्लिम आहे म्हणून तिला न्याय मिळालेला नाही. २० वर्षे ती न्याय आणि हक्कांसाठी लढते आहे. मी मुस्लिम आहे माझ्याशिवाय हा देश अधुरा आहे. आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनवर का बोलत नाहीत? मुस्लिम म्हटलं की तुम्हाला हिरवा रंगच का दिसतो? असंही ओवैसी यांनी विचारलं आहे. या सरकारने इंदिरा गांधींकडून धडा घेतला पाहिजे त्या म्हणत असत की न्यायव्यवस्था ही माझी शक्ती आहे. मोदी सरकार म्हणतं आहे की न्यायव्यवस्थेने आमच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. जे ख्रिश्चन धर्म मानतात ते पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहेत का? असाही प्रश्न ओवैसी यांनी विचारला असता.
न्याय व्यवस्था मोदींना मदत का करते आहे? त्यांनी योग्य न्याय केला पाहिजे. गरीब आणि बेरोजगारांचे प्रश्न कुणी निर्माण केले आहेत? अल्पसंख्याक शब्दाला जन्म कुणी दिला? काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला. आपल्या देशात मुस्लिमांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजे. कोर्ट असोत किंवा न्यायाधीश असोत त्यांचं काम मोदींना मदत करणं नाही तर योग्य न्याय करणं आहे असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारला सांगेन की अल्फाबेट A हे तुमच्यासाठी अशुभ आहे. तुम्ही अदाणी यांना कंत्राटं दिली आता त्यांची अवस्था काय झाली आहे बघा. हिंडेनबर्ग जर भारतात झालं असतं तर UAPA लागला असता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाताना महात्मा गांधींचं नाव घेतात असंही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.