राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे बिहार पदयात्रेवर आहेत. मात्र आत्तापर्यंत त्यांनी हे स्पष्ट केलेलं नाही की त्यांची संघटना निवडणूक लढणार की नाही? अशात अशी चर्चा सुरू आहे की प्रशांत किशोर हे एक राजकीय पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. आपल्या भाषणात ते म्हणाले की मला सरकारमध्ये सहभागी होण्यात काहीही रस नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन सुराज पदयात्रेच्या मोतिहारी अधिवेशन मध्ये जनतेच्या समोरच प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे की मला जर सरकारमध्ये सहभागी व्हायचं असतं तर मी आज फोन केला असता आणि शपथ घेतली असती. मला सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाही. मला अशी व्यवस्था हवी आहे जिथे बिहारमधले योग्य लोक समोर येतील आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाता येईल.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की जनसुराजचा नेता तोच असेल जो बिहारमधला सर्वात सुयोग्य माणूस असेल. असं अजिबात नाही की या मोहिमेचं नेतृत्त्व मी करतो आहे म्हणून मीच पुढारी होईन असं काहीही नाही. बिहार मधला सर्वात चांगला माणूस पुढे येईल तोच नेता असेल असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधीही एकदाच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. तरीही काँग्रेस पक्ष पुढे व्यवस्थित चालला. त्याचप्रमाणे जनसुराजची प्रगती होईल असं मला वाटतं असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

२०२४ मध्ये पक्ष स्थापन झाला तर लोकसभा निवडणुकीत उतरणार का?
२०२४ च्या आधी पक्ष स्थापन झाला तर लोकसभा निवडणुकीत उतरायला हवं का? याबाबत मतदान घेतलं गेलं. पक्ष स्थापन झाल्यास लोकसभा निवडणूक लढली पाहिजे ? या प्रश्नावर एकूण ३६९१ मतं पडली. त्यातर १७६ मतं विरोधात पडली म्हणजेच लोकसभा निवडणूक लढवायला नको असं त्यांचं मत पडलं. तर बाकीची ३५१५ या बाजूने पडली की निवडणूक लढवली पाहिजे.

बिहारचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे? हा प्रश्न विचारण्यात आला त्यावर ५० टक्के लोकांनी बेरोजगारी हा सर्वात मोठी समस्या असल्याचं म्हटलं आहे. तर ३३ टक्के लोकांनी भ्रष्टाचार ही समस्या आहे असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तर १७ टक्के लोकांनी शेतकऱ्यांची गरिबी हा मुद्दा मांडला आहे.

रविवारी झालेल्या अधिवेशनाच्या आधी चंपारण जिल्ह्यात जनसुराज च्या २७ प्रखंडातल्या हजारो लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच मतदान झालं. त्यानंतर काही अतिथी आले होते त्यांची भाषणं झाली. यानंतर जनसुराजबाबत प्रशांत किशोर यांनी त्यांची मतं मांडली. मी या दृष्टीने विचार करतो आहे की आपल्या आयुष्यात मी बिहार हे देशातलं एक प्रगतीशील राज्य झालं पाहिजे. ही माझी महत्त्वकांक्षा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If i want to join the government i would have called today and taken oath tomorrow said prashant kishor scj
Show comments