आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आता इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील आरएलडी इंडिया आघाडीतून बाहेर पडत एनडीएबरोबर जाण्याच्या तयारीत आहे. तसेच दोघांमध्ये जागावाटपाबाबतची चर्चाही अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

जर आरएलडी इंडिया आघाडीतून बाहेर पडत एनडीएत सहभागी झाली, तर भाजपासाठी ते अनेक अर्थांनी फायदेशीर असेल. त्यामुळे भाजपाला उत्तर प्रदेशात आपला पाय मजबूत करण्यास आणि जाट समाजाची मतं आपल्याकडे खेचण्यास मदत होईल. याशिवाय भाजपाला सात लोकसभा मतदारसंघातही फायदा होईल, असेही सांगण्यात आहे.

Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
Waqf Amendment Bill to be tabled in February 2025 budget session
‘वक्फ’मध्ये महत्त्वाचे बदल नाहीच? मूळ विधेयक लोकसभेत संमत होण्याची शक्यता
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar stake claim to form Mahayuti govt in Maharashtra
मुख्यमंत्री केवळ तांत्रिक व्यवस्था’ : तिघांनाही एकत्रित निर्णय घेण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

हेही वाचा – हरियाणात काँग्रेसचे प्रमुख चेहरे लोकसभा यादीतून गायब; १० जागांसाठी काँग्रेसचे २९९ उमेदवार इच्छुक

भाजपातील अंतर्गत सुत्रांनी सांगितले, की ”जयंत चौधरी किंवा त्यांच्या पत्नी चारू सिंग या बागपतमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.” ही जागा एकेकाळी आरएलडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. मात्र, २०१४ मध्ये भाजपाने या जागेवर विजय मिळवला. सध्या भाजपाचे सत्यपाल सिंग हे बागपतचे खासदार आहेत. तसेच आरएलडी बिजनौरची जागाही लढण्याची शक्यता आहे. याशिवाय आरएलडीला राज्यसभेची एक जागाही मिळू शकते, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री सोमपाल शास्त्री यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात बोलताना भाजपाचे वरिष्ठ नेते म्हणाले, “आरएलडीबरोबर जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाला असून केवळ औपचारीक घोषणा बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएने आगामी निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळेच आम्ही छोट्या प्रादेशिक पक्षांबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे.”

ते पुढे म्हणाले, ”आरएलडीबरोबर युती झाल्यास, पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपाला आपला पाया मजबूत करण्यास मदत होईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. मात्र, काही सर्वेनुसार भाजपाला बिजनौर, अमरोहा, कैराना, मुझफ्फरनगर, मेरठ, फतेहपूर सिक्री आणि हाथरस फटका बसू शकतो. या मतदारसंघात पक्षाला चुरशीली लढत होणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र, आता आरएलडी आमच्याबरोबर आल्यास आम्हाला त्याचा फायदा होईल.”

हेही वाचा – ”लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी म्हणजे गोपनीयतेचे उल्लंघन,” अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ”भाजप निवडणुकीपूर्वी…”

पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा मिळून जवळपास ४० मतदारसंघामध्ये जाट समजाचा प्रभाव आहे. या मतदारसंघांमध्ये जाट समाजाची लोकसंख्या जवळपास १० ते १५ टक्के असण्याचा अंदाज आहे. महत्त्वाचे म्हणजे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने यापूर्वी संजीव बल्यान यांना राज्यमंत्री, तर भूपेंद्र चौधरी यांना उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवले होते. याशिवाय शुक्रवारी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याच्या निर्याकडेही जाट मतदारांवर डोळा ठेऊन घेण्यात आलेला निर्णय म्हणून बघितलं जात आहे. दरम्यान, आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांना एनडीएत सहभागी होण्याबाबत आणि भाजपाशी वाटघाटीबाबत विचारले असता, हा दोन पक्षातील करार नसून विश्वासाचा भाग असल्याचे, ते म्हणाले.

Story img Loader