कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी १४ जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी पक्ष विजयाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले आहे. खरं तर राज्यातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये या निवडणुकीनंतर खळबळ उडणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी द इंडियन एक्सप्रेसला विशेष मुलाखत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील टप्प्यात झालेल्या १४ जागांवर भाजपाने कितपत चांगली कामगिरी केली?

मी आमच्या पक्षाच्या सर्व जिल्हा घटकांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. सर्व जागांवर विजय मिळणार असल्याचा आम्हाला विश्वास आहे. बंगळुरू ग्रामीणमध्ये डॉ. सी. एन. मंजुनाथ हे विद्यमान काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांच्या विरोधात १ लाखांपेक्षा जास्त फरकाने विजयी होणार आहेत. ज्या मतदारसंघात आम्ही ५०/५० चा फॉर्म्युला वापरला त्या मतदारसंघातही आम्ही चांगली कामगिरी करू शकलो आहोत.

राज्यात भाजपा आणि जेडी(एस) युतीचे चांगले काम झाले नाही, अशी बरीच टीका होत आहे?

भाजपा आणि जेडी(एस)च्या संदर्भातील युती हा घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयांपैकी एक होता. त्याचा भाजपा आणि जेडीएस दोघांनाही फायदा होणार आहे. होय, एकमेकांच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासंबंधी किंवा इतर काही किरकोळ समस्या होत्या, परंतु आता सगळे चांगले झाले आहे. या युतीमुळे आम्हाला अनेक मतदारसंघांमध्ये भाजपा आणि जेडी(एस) मते एकत्रित करण्यात मदत झाली आहे, जी आम्हाला जिंकण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.

तुम्हाला प्रज्वल रेवण्णा प्रकरणाची माहिती होती का? प्रज्वलवर कारवाईची मागणी करणार का?

मी भाजपाच्या दृष्टिकोनातून स्पष्ट करतो की, या प्रकरणात कोणीही समर्थन करू शकत नाही. देवराजे गौडा यांनी लिहिलेले पत्र मला माहीत नाही. मला असे कोणतेही पत्र मिळालेले नाही. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला या घडामोडीची जाणीव असेल, असे मला वाटत नाही. भाजपाच्या हायकमांडला याची जाणीव होती, असे म्हणणे अयोग्य आहे. आम्हाला माहिती असते, तर प्रज्वल निवडणूक लढवण्याचा प्रश्नच कुठे आला असता. JD(S) पक्षाने आधीच त्यांना निलंबित करून कारवाई सुरू केली आहे आणि त्यांना परिस्थितीला सामोरे जावे लागेल आणि उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

तुमची प्रदेश भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊन जवळपास सहा महिने झाले. मात्र तुमच्या पक्षातील भांडणे सुरूच असल्याचे दिसून येते.

उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातही वाद आहेत, तुम्हाला हे माहीत आहेत का? फरक एवढाच आहे की, ते जाहीरपणे समोर आलेले नाहीत, पण आमच्या पक्षात काही नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यानंतर त्यांची हकालपट्टी केली आहे. ही एक सामान्य घटना आहे आणि आपण सर्वांसाठी नायक होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. उदाहरणार्थ, के. एस. ईश्वरप्पा यांनी सीमा ओलांडली आणि त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले.

कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीनंतर तुम्हाला कोणते राजकीय बदल अपेक्षित आहेत?

शिवकुमार सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदी राहू देणार नाहीत. हे फक्त मीच नाही, काँग्रेसचे नेते सांगत आहेत. काँग्रेसमधील लढत तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. काँग्रेसच्या अल्पसंख्याक तुष्टीकरणाला जनता कंटाळली आहे. विकासासाठी एक रुपयाही सोडला नाही.

तुमचे वडील येडियुरप्पा हे राज्यात भाजपाचा चेहरा होते, पण आता ते “चेहराविहीन” झाले आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व केले. तुमचे मत काय आहे?

तुम्ही खूप पुढचा विचार करीत आहात. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने मला उत्तम संघटक असायला हवे. मी जुन्या म्हैसूर प्रदेशात समर्थक संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, जिथे ऐतिहासिकदृष्ट्या आम्ही चांगली कामगिरी केलेली नाही. येत्या काही दिवसांत परिस्थिती बदलेल. २०२३च्या विधानसभा निवडणुकीत खूप उणिवा होत्या.

हेही वाचाः संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा प्रचार सभांमध्ये केंद्रस्थानी, दावे-प्रतिदावे नेमके काय?

पीएम मोदींच्या राज्यातील सभांमध्ये तुम्ही का दिसत नाहीत?

चुकीची माहिती आहे. प्रदेशाध्यक्षांनी सर्व कामे सोडून रॅलीत सहभागी व्हावे, असेही पंतप्रधानांना वाटत नाही. मात्र, आता मी पंतप्रधानांच्या रॅलीत सहभागी होत आहे. मी प्रचारासाठी फक्त दोन दिवस शिवमोग्गा (गृहजिल्हा) येथे आलो आहे.

या निवडणुकीत राज्यातील काही हिंदुत्ववादी चेहऱ्यांना तिकीट नाकारण्यात आले, ज्यासाठी ईश्वरप्पा तुम्हाला दोष देतात. तुमचा प्रतिसाद काय आहे?

तिकीट ठरवण्यात अनेक घटकांचा सहभाग असतो. त्यावर चर्चेसाठी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेतला जातो. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र किंवा भाजपा संसदीय मंडळाचे सदस्य येडियुरप्पा हे दोघेही निर्णय घेणारे नाहीत. शेवटी निर्णय हायकमांड घेतो.

हेही वाचाः

ईश्वरप्पा यांनी बंडखोर म्हणून निवडणूक लढवल्याने शिवमोग्गामधील भाजपाच्या संभाव्यतेला धक्का बसेल असे तुम्हाला वाटते का?

ईश्वरप्पा आपले डिपॉझिट वाचवतील का? अशी चर्चा सुरू आहे. विजय ही तर दूरची गोष्ट आहे आणि लोक त्यांना विसरले आहेत. भाजपामुळेच त्यांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या.

भाजपाचे काही नेते याला राज्यातील बाप-मुलग्याचा पक्ष म्हणतात, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय आहे?

येडियुरप्पा यांच्या मुलाच्या कारणास्त मला प्रदेशाध्यक्ष बनवले गेले नाही. मी एक दशकाहून अधिक काळ पक्षासाठी काम केले आहे आणि एक चांगला संघटक आहे. हायकमांडने त्याची दखल घेत मला हे पद दिले आहे. पक्षाला अशी हाक मारण्यात काही अर्थ नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If we know where does the question of contesting prajwal elections come from karnataka bjp chief reply vrd
Show comments