भाजपाने एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएमध्ये भाजपासहित एकूण ३७ पक्षांचा समावेश आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि लोक जनशक्ती पक्षाचे फुटीर गट आहेत. या सर्व पक्षांची मंगळवारी (दि. १८ जुलै) दिल्ली येथे बैठक पार पडली. यापैकी १० पक्षांनी २०१९ ची निवडणूक लढविली नव्हती. उरलेल्या २३ पक्षांनी निवडणूक लढविली होती, पण त्यापैकी फक्त आठ पक्षांना ९ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आणि त्यांना २ कोटी मतदान मिळाले, अशी माहिती २०१९ च्या मतदानाच्या आकडेवारीनंतर समोर आली.

मंगळवारी झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषविले होते. यावेळी एकत्र आलेले पक्ष एनडीएअंतर्गत आगामी २०२४ ची निवडणूक लढविणार आहेत. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया या आघाडीमध्ये २६ पक्ष आहेत. या छोट्या पक्षांसोबत युती करून भाजपाने विविध भौगोलिक प्रदेश आणि अनेक छोट्या छोट्या समाजांपर्यंत पोहोचण्याचा विचार केलेला दिसतो. २०१९ च्या निवडणुकीच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, भाजपा वगळता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, लोक जनशक्ती पार्टी आणि शिवसेनेने इतरांपेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे.

Kalpana Soren electoral campaign
Kalpana Soren: झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा; महिलांसाठीच्या योजना गेमचेंजर ठरणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
minister chandrakant patil opinion on next cm in the loksatta loksamvad program
मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
confusion names voters Koparkhairane, Koparkhairane,
२५० मतदारांच्या नावांचा घोळ; कोपरखैरणेत नावे वगळणे, भलत्या मतदान केंद्रात नाव गेल्याचे प्रकार, तक्रार दाखल

हे वाचा >> ‘इंडिया’ विरुद्ध एनडीए : विरोधकांच्या आघाडीने ‘यूपीए’ नाव का बदलले?

भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ३०३ जागांवर विजय मिळवला होता. त्यांना देशभरातून ३७.६९ टक्के मतदान मिळाले होते. एका वर्षापूर्वी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपासोबत हातमिळवणी केली. २०१९ साली शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळवला होता. त्यांना महाराष्ट्रात २३.५ टक्के मतदान मिळाले होते.

त्याचप्रकारे लोक जनशक्ती पार्टीदेखील दोन गटात विभागलेली आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांचा एक गट आहे, तर त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांचा दुसरा गट आहे. या दोन्ही पक्षांनी मागची निवडणूक एनडीएकडून लढवत असताना बिहारमधील सहा जागांवर विजय मिळवला होता. त्यांनी राज्यातील ८ टक्के मतदान घेतले होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेससह आघाडीमध्ये निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीकडे राज्यात एकूण चार खासदार असून त्यांनी १.३९ टक्के मते मिळवली होती.

शिरोमणी अकाली दल (संयुक्त), महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी (MGP), जन सुराज्य शक्ती पार्टी, कुकी पिपल्स अलायन्स, हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, निषाद पार्टी, हरयाना लोकहित पार्टी, केरळ कामराज काँग्रेस, पुथिया तमिलगम आणि गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट या १० पक्षांनी २०१९ च्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले नव्हते. उरलेल्या २३ पक्षांपैकी १२ पक्ष प्रादेशिक पातळीवरील पक्ष आहेत आणि ११ नोंदणीकृत असलेल्या मात्र फारशा माहीत नसलेल्या पक्षांचा समावेश आहे. यापैकी आठ पक्षांनाच मागच्या निवडणुकीत खासदार निवडून आणता आले आहेत. या सर्व पक्षांना मिळून २.०७ कोटी मतदान प्राप्त झालेले आहे.

उमेदवार जिंकून आणता आलेल्या त्या २३ पैकी आठ पक्षांमध्ये अपना दल (सोनेलाल), एजेएसयू, अण्णाद्रमुक, मिझो नॅशनल फ्रंट, नागा पिपल्स फ्रंट, नॅशनल पिपल्स पार्टी, नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि सिक्किम क्रांतीकारी मोर्चा या पक्षांचा समावेश आहे. अपना दल (सोनेलाल) या पक्षाने एनडीएच्या युतीमध्ये निवडणूक लढवित उत्तर प्रदेशमध्ये दोन मतदारसंघात विजय मिळविला. इतर सात पक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला.

हे वाचा >> विरोधकांची बंगळुरू, तर भाजपप्रणीत एनडीएची दिल्लीत बैठक; बघा कुणाकडे किती संख्याबळ

भाजपासह सर्व ३७ पक्ष आता एनडीएचा घटक असणार आहेत. तर २३ पैकी १५ पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या पक्षांच्या एकत्रित ९२ लाख एवढे मते मिळाली आहे.

भोपळाही फोडता न आलेल्या या १५ पक्षांमध्ये ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस, आसाम गण परिषद, इंडिजनस पिपल्स फ्रंट त्रिपुरा, पट्टली मक्कल कट्ची, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, भारत धर्म जन सेना, हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष), जनसेना पार्टी, जननायक जनता पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, तमिळ मॅनिला काँग्रेस (मूपनार) आणि युनाटेड पिपल्स पार्टी या पक्षांचा समावेश होता.

2019 lok sabha election result
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएतील घटकपक्षांना मिळालेल्या जागा आणि मतदान. (निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून साभार)

भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, लोकजनशक्ती आणि निवडणूक लढविलेले १० पक्ष सोडले तर उर्वरीत २३ पक्षांची २०१९ च्या निवडणुकीतील कामगिरी पाहा.