महेश सरलष्कर

काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून रायपूरमध्ये सुरू झाले असून शुक्रवारच्या पहिल्या सत्रामध्ये पक्षासाठी कळीच्या ठरलेल्या कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सुकाणू समितीतील अन्य सदस्यांनी दबावाविना निर्णय घ्यावा, असे राहुल गांधींचे म्हणणे आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा हे तिघेही सुकाणू समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?

सुकाणू समितीची बैठक दिवसभर सुरू राहील. कार्यकारिणी समितीच्या निर्णयानंतर, राजकीय, आर्थिक, परराष्ट्र संबंध, सामाजिक न्याय, शेती आणि युवा, शिक्षण, रोजगार असे विषयवार एकूण सहा ठराव निश्चित केले जाणार असून त्यावर शनिवार व रविवार खुली चर्चा केली जाणार आहे. अधिवेशनाची सांगता रविवारी दुपारी दोन वाजता पक्षाध्यक्ष खरगेंच्या भाषणाने होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा… सांगलीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांची अशीही मशागत

अधिवेशनातील पहिल्याच बैठकीचा अजेंडा कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीचा असल्याने सुकाणू समितीमध्ये घमासान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे पक्षातील नेते तात्पुरते एकत्र आल्याचे दिसले असले तरी, महाराष्ट्र-राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अशा वेळी कार्यकारिणी समितीतील सदस्य निवडीसाठी निवडणूक घेऊन नेत्यांना एकमेकांविरोधात कशासाठी लढवायचे असाही पक्षांतर्गत सूर आहे. सुकाणू समितीमध्ये निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले तर निवडणूक घेण्याची तयारी झाल्याची माहिती माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी रायपूरमध्ये दिली.

हेही वाचा… Maharashtra News Live: उद्धव ठाकरे यांना हिशोब तर द्यावाच लागणार – किरीट सोमय्या

कार्यकारिणी समितीवर १२ सदस्य निवडले जातात तर १३ सदस्यांची पक्षाध्यक्षांकडून नियुक्ती केली जाते. या रचनेमध्ये बदल केले जाण्याची शक्यता असून माजी पक्षाध्यक्ष व माजी पंतप्रधान यांना कायमस्वरुपी सदस्यत्व दिले जाऊ शकते. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच, मनमोहन सिंग यांनाही कार्यकरिणी समितीमध्ये स्थान मिळू शकेल. प्रियंका गांधी-वाड्रा मात्र निवडणुकीच्या माध्यमातून समितीवर येऊ शकतील. कार्यकारिणी समितीसह पक्षाच्या सर्व स्तरांतील पदभरतीमध्ये अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, महिला व अल्पसंख्य यांच्यासाठी ५० टक्के पदे राखीव ठेवण्याचा ठरावही होऊ शकेल. ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्यकर्त्यांना ५० टक्के पदांवर संधी मिळू शकेल.

हेही वाचा… आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण काँग्रेसला खरंच शक्य आहे? देशातील ‘राजकीय गणित’ नेमकं कसं आहे? जाणून घ्या

राजकीय ठरावांद्वारे विरोधी पक्षांच्या एकजुटीवर सहमती साधण्याचा प्रयत्न केला जाईल. विरोधकांच्या एकजुटीबाबत काँग्रेस गंभीर असल्याचे संकेत खरगे यांनी गेल्या दोन दिवसांमधील भाषणातून दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसआघाडी (यूपीए) मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘यूपीए’मध्ये नसलेल्या पक्षांशीही संवाद साधला जाऊ शकतो. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, भारतीय राष्ट्र समिती आदी काही पक्षांशी चर्चा होऊ शकत नाही. पण, नितीशकुमार यांच्या जनता दल (सं) आदी काही बिगर यूपीए पक्षांशी जुळवून घेतले जाऊ शकते. विरोधी पक्षांच्या ऐक्यावरूनही काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. गांधी निष्ठावान काँग्रेसकेंद्रीत विरोधी एकजुटीवर भर देत आहेत. तर, काँग्रेसने अधिक लवचिकता दाखवली पाहिजे, असे काही काँग्रेसजनांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… कोकण दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची नव्याने राजकीय फेरजुळणी

राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना झालेली अटक तसेच, काँग्रेसचे दिग्गज सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी. आर. केसवन यांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी हे पक्षाला अस्वस्थ करणारे मुद्देही बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता आहे. केसवन यांच्या निमित्ताने काँग्रेसमधील गळतीच्या विषयाला गांधी कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीत हात घातला जाऊ शकतो. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुमारे १५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

Story img Loader