अमरावती : परतवाडा येथे ईदच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी कारवाई सुरू केली असली तरी, या घटनेवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात अचलपूर येथे उफाळून आलेल्या जातीय संघर्षाचे निखारे विझलेले नसताना आता पुन्हा नव्याने वाद उभा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

परतवाडा येथील महावीर चौकात हे आक्षेपार्ह गाणे वाजविण्यात आले होते. सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येईल, असे कृत्य करताना दोन समाजांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अचलपूर-परतवाडा हे जुळे शहर जातीयदृष्‍ट्या संवेदनशील मानले जाते. अचलपुरातील दुल्हा दरवाजावर झेंडा लावण्याच्या वादातून दोन समुदायातील नागरिकांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना गेल्या एप्रिलमध्ये घडली होती. पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्याने दंगलीची स्थिती निर्माण होऊ शकली नाही, पण हे जुळे शहर धगधगते ठेवण्याचे प्रयत्न काही घटकांकडून केले जात आहेत का, असा सवाल केला जात आहे.

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?

हेही वाचा… शिवसेनेच्या आक्रमक भाजपविरोधी भूमिकेमुळे ‘एमआयएम’ची कोंडी; सेनेबाबतच्या धोरणाबद्दल संभ्रम

एखाद्या समुदायाची एक आक्षेपार्ह कृती ही दुसऱ्या समुदायाचे माथे भडकवणारी ठरते आणि संघर्ष उभा राहतो. यात दोन्ही समुदायातील पुढाऱ्यांनी समन्वय, सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित असते, पण त्याचा अभाव गेल्या काही महिन्यांतील घटनांमधून दिसून आला आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कडून या घटनेवर अद्याप प्रतिक्रिया आली नसली, तरी भाजपच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.

हेही वाचा… पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

ईदनिमित्ताने परवाड्यात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वादग्रस्त नारे देण्यात आले. ही कोणती मानसिकता आहे? मिरवणूक काढायला विरोध नाही. मात्र, कोणाचा जीव घ्यावा या मानिकतेचा आम्ही विरोध करतो. या मिरवणूक सहभागी झालेले अनेक जण पीएफआयशी संबंधित आहेत. यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली. दुसरीकडे भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून हिंदू-मुस्लीम दंगल भडकावून मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे.

हेही वाचा… मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून पेच ; पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गटात लढाई

अशाच पद्धतीचा आक्षेप भाजपवरही घेण्यात आला आहे. अमरावतीत उसळलेल्या दंगलीनंतर भाजपने पद्धतशीररीत्या प्रचार यंत्रणा राबवून हिंदू मतांचे धृवीकरण चालवल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. परस्परांवर आरोप केले जात असताना अचलपूर-परतवाडा हे कायम तणावाच्या सावटाखाली असू नये, याची काळजी धुरिणांचा घ्यावी लागणार आहे.
आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय तणावाचे मुद्दे उकरून काढले जातील आणि त्याचा फायदा राजकीयदृष्ट्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न केले जातील, असे आता उघडपणे बोलले जात आहे.

Story img Loader