नगर : अखेर गेल्या काही दिवसांपासून इन्कार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार निलेश लंके यांनी आज, गुरुवारी सायंकाळी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये, शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांची नगर दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व शरद पवार गटाचे आमदार लंके यांच्यामध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीत विखे विरोधक लंके यांच्या पाठीमागे एकवटले जाण्याची शक्यता आहे. ही लढत केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसेल तर ती विखे विरुद्ध पवार अशीच रंगण्याची जास्त शक्यता आहे. नगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसताना एकाचवेळी अजित पवार यांना धक्का देत परंपरागत विरोधक विखे यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करण्याच्या व्यूहरचनेत शरद पवार यांची खेळी यशस्वी झाल्याचे मानले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा