नगरः धार्मिक ध्रुवीकरणातून एकवटलेल्या मुस्लिम मतांचे एकगठ्ठा मतदान हे नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयाचे मुख्य सूत्र ठरले असल्याचे आता विभागवार मतांचे तपशील हाती आल्यावर पुढे आले आहे. या भागातून लंकेंनी घेतलेली आघाडी निर्णायक ठरली आहे. विशेष म्हणजे विजयी झाल्यानंतर स्वतः नीलेश लंके यांनीही त्यांच्या विजयात मुस्लिम समाजाचा मोठा वाटा असल्याचे मान्य करत त्यांचे विशेष आभार मानले.

नगर लोकसभा मतदारसंघात सन २०१९ च्या तुलनेत यंदा सुमारे ५७ हजारांहून अधिक मतांची वाढ झालेली आहे. ही सर्व वाढीव मते मुस्लिम बहुल भागातील आहेत. मुस्लिम समाज यंदा मतदानासाठी आवर्जून बाहेर पडल्याचे चित्र नगर शहरात जाणवत होते. मतांची टक्केवारी वाढण्याचे हे एक मुख्य कारण ठरले आहे. लंके विजयी झाल्यानंतर शहरातील मुस्लिम बहुल भागात समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लंके यांच्या अभिनंदनाचे फलक आवर्जून लावलेले आहेत. मतदानापूर्वीही मुस्लिम समाज संघटनांनी धार्मिक स्थळातून, पत्रकाद्वारे लंके यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते.

students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
Maharashtra hospitals loksatta news
दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
Bharatiya Suvarnakar Samaj carried out census of 1200 houses in Indiranagar
सुवर्णकार समाजाचा नाशिक जिल्ह्यात खानेसुमारीचा संकल्प, शहरातील काही भागात पाच हजार जणांची माहिती संकलित
India criticises One Nation One Election Bill for not having two thirds majority in Lok Sabha
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयके लोकसभेत, दोन तृतीयांश बहुमत नसल्याची ‘इंडिया’ची टीका
Kumbh Mela Nashik , Nashik Guardian Minister,
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रिपदाला महत्व, महायुतीत शह-काटशहाचे राजकारण

हेही वाचा : मोहन भागवतांच्या कानपिचक्या संघ आणि भाजपामधील अंतर वाढल्याच्या निदर्शक आहेत का?

या धोरणाचाच एक भाग म्हणजे नगर मतदारसंघातून ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अश्रफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र समाजमाध्यमातून मुस्लिम युवकांनी त्यांच्यावरच आरोपांचा भडीमार केल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. परिणामी मुस्लिम मतांचे विभाजन टळले गेले व ते नीलेश लंके यांच्या बाजूने एकवटले गेले.

महायुतीतील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेतून मोदी यांनी मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्याविषयी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसवर आरोप केले. या वक्तव्यातून अगोदरच झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणात नव्याने भर पडली. या ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज मतदानासाठी एकगठ्ठ्याने बाहेर पडला. मुस्लिम बहुल भागात या लोकांनी रांगा लावून मतदान केले. सन २०१९ च्या तुलनेत यंदा नगर मतदारसंघात सुमारे ५७ हजारांहून अधिक मतांची वाढ झाली आहे. ही सर्व वाढीव मते मुस्लिम बहुल भागातील आहेत. या तुलनेत हिंदू बहुल भागातील मतदानात तशी फारशी वाढ झाली नाही. नगर मतदारसंघातील हा फरकच पुढे लंके यांच्या पथ्यावर पडला.

हेही वाचा : “संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर

भाजप व मोदींचा मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचाच प्रयत्न होता. या प्रयत्नातून ध्रुवीकरण झाले खरे मात्र त्यातून मुस्लिम मतदार एकवटला गेला. त्या तुलनेत हिंदुत्ववादी मतदार एकवटला गेला नाही आणि तो मतदानासाठीही फारसा बाहेर पडला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी नगर मतदारसंघात ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आले होते. त्याचाही फारसा परिणाम मतदानावर जाणवला नाही.

हेही वाचा : Lok Sabha Result 2024: अमिताभ बच्चन… १९८४ ची निवडणूक आणि काँग्रेसची ४० वर्षांची प्रतीक्षा; ‘या’ मतदारसंघात पक्षानं पुन्हा मारली बाजी!

भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्यामुळे दलित समाज राज्यघटनेमध्ये बदल केला जाईल का, या शंकेने ग्रासला होता तसेच ते मुस्लिम समाजालाही ग्रासलेले होते. लंके व विखे यांच्यातील थेट सरळ लढतीत. मतविभाजनाचा अन्य कोणताही मुद्दा नव्हता. त्यातूनही मुस्लिम समाज लंके यांच्याकडे एकवटला गेल्याची चर्चा आता होत आहे. नगर मतदारसंघात नगर शहरासह राहुरी, जामखेड, शेवगाव विधानसभा क्षेत्रात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. सुजय विखे यांचे सन २०१९ मधील मताधिक्य कमी करण्यास व नीलेश लंके यांचे मताधिक्य वाढवण्यास मुस्लिम मतदारांचा हातभार लागल्याचे मानले जाते.

Story img Loader