अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा गड राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत ‘अकोला पश्चिम’मध्ये काँग्रेसने १२ हजारांवर मतांची आघाडी घेतल्याने भाजपच्या चिंतेत वाढ झाली. तब्बल २९ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसोबतच रिक्त असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमदेखील जाहीर झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ही निवडणूक रद्द केली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे.. शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या शर्मा यांच्या पश्चात ती परंपरा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. मतदारसंघात सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. शर्मा यांच्या तुल्यबळ नेता भाजपला आता मिळणे शक्य नाही. तरी त्यांचा उत्तराधिकारी कोण होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Constituent parties Shiv Sena and NCP in Mahayuti in Vasai are upset
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत

हेही वाचा : मराठा आरक्षणाचा निर्णय पंतप्रधानांनीच घ्यावा; आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी चेंडू पंतप्रधान मोदींकडे टोलावला

अकोला पश्चिममध्ये भाजप कोणाला उमेदवारी देते यावर बरेच गणित अवलंबून राहील. भाजप नेतृत्व शर्मा कुटुंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी देणार, हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी, ॲड. मोतीसिंह मोहता, विजय अग्रवाल, गिरीश जोशी यांच्यासह २२ पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

‘अकोला पश्चिम’ची उमेदवारी देताना भाजपकडून सारासार विचार केला जाईल. त्यामध्ये जातीय समीकरणदेखील महत्त्वपूर्ण ठरेल. विजयाची ‘डबल हॅट्ट्रिक’ साध्य करणाऱ्याशर्मा यांना २०१९ मध्ये काँग्रेसने कडवी झुंज दिली होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत त्यांचा दोन हजार ३६९ मतांनी निसटता विजय झाला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. खासदार धोत्रे यांच्यापेक्षा काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना १२ हजार ०७१ मते अधिक पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. या मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी भाजपची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : तमिळनाडूमध्ये महिनाभरात ५ राजकीय कार्यकर्त्यांची हत्या; काय आहे कारण?

दुहेरी कोंडी

अकाेला पश्चिमच्या जागेवरून भाजपची दुहेरी कोंडी होताना दिसते. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिल्यावरून भाजपला टीकेचा सामना करावा लागला. विरोधी वातावरणातदेखील अकोला लोकसभेचा गड जिंकून पक्षनेतृत्वाचा तो निर्णय योग्यच ठरल्याचे सिद्ध झाले. आता विधानसभा निवडणुकीतसुद्धा शर्मा कुटुंबात उमेदवारी गेल्यावर घराणेशाहीचा ठपका भाजपवर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्य उमेदवार दिल्यास लोकसभेत एक, तर विधानसभेत दुसरा नियम का, असा सवाल करून पक्षांतर्गतच एक मोठा गट नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आता कुठली रणनीती आखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.