अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात महायुतीमध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा ठरला. महायुतीतील प्रमुख तिन्ही घटक पक्षांकडून बाळापूरवर दावा करण्यात आला आहे. मतदारसंघासाठी या पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश इच्छुकांच्या नजरा बाळापूर मतदारसंघाकडे लागल्या असून महायुतीत कुणाला हा मतदारसंघ सुटतो, यावर निवडणुकीचे समीकरण ठरेल.

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली. अकोला जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त झाली. अकोला पूर्व, मूर्तिजापूर व अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर बाळापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व आहे. बाळापूर मतदारसंघावर महायुतीतील सर्वच घटक पक्षांचा डोळा आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी अकोला जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपचा नारा दिला. जिल्ह्यातील चार मतदारसंघात वर्चस्व असलेल्या भाजपने बाळापूर देखील ताब्यात घेण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखली आहे. भाजपने बांधणीला देखील केली. वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेमुळे भाजपमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बाळापूरमधून लढण्यासाठी भाजपमध्ये सहा ते सात जण इच्छूक आहेत. त्यामध्ये दोन माजी आमदारांचा देखील समावेश आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढविल्यास आमच्या वाट्याला काय? असा प्रश्न महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित केला.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?

हे ही वाचा… Amit Shah: अमित शाह यांचा बैठकांचा सपाटा; देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, गडकरींची अनुपस्थिती, मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर काय म्हणाले?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये बाळापूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. याठिकाणी युतीचा विजय होऊन शिवसेनेचे नितीन देशमुख आमदार झाले. आता गेल्या पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राजकीय समीकरणात व्यापक फेरबदल झाला. बाळापूर मतदारसंघ परंपरागत शिवसेनेकडे असल्याचे सांगूत आता त्यावर शिंदे गटाने दावा ठोकला. महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडून केली जात आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर हालचाली देखील सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांच्यासह आजी, माजी पदाधिकारी असे सात ते आठ जण इच्छूक आहेत. ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शिवसेना फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत व गुवाहाटी गाठलेले आमदार नितीन देशमुख यांनी नंतर घुमजाव करून उद्धव ठाकरेंकडे वापसी केली होती. त्यामुळे आता आमदार नितीन देशमुख यांना निवडणुकीत घेरण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून पुरेपूर रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील बाळापूर मतदारसंघावर दावा केला. राष्ट्रवादीतील तीन ते चार इच्छूक त्यासाठी आग्रही आहेत. बाळापूर मतदारसंघावरून जिल्ह्यात महायुतीत मोठे घमासान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा… चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी?

भाजपमधील इच्छूक शिंदे गटाच्या संपर्कात

महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ भाजप शिवसेना शिंदे गटासाठी सोडेल, या राजकीय चर्चेने जोर पकडला. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढायची, अशी महत्त्वाकांक्षा असलेले भाजपमधील काही इच्छूक उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटात देखील जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाहरकत मिळविण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे.

Story img Loader