प्रबोध देशपांडे

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीने आपला दबदबा कायम राखला आहे. अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत वंचितने एकतर्फी विजय मिळवत इतर पक्षांचा धुव्वा उडवला. या विजयामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित आघाडीचे मनोबल वाढले असून आगामी निवडणुकांमध्ये याचा प्रभाव पडणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल

अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचितचा गड म्हणून ओळखला जातो. अकोला जिल्हा परिषद वंचित आघाडीचे सत्ता केंद्र असून दोन दशकाहून अधिक काळापासून येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सत्ता कायम आहे. तत्कालीन कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांच्या निधनामुळे चोहट्टा जिल्हा परिषदेची जागा अनेक महिन्यांपासून रिक्त झाली होती. या ठिकाणी वंचितने पंजाबराव वडाळ यांचे पूत्र योगेश वडाळ यांना पुन्हा रिंगणात उतरवले होते. वंचित आघाडीसाठी प्रतिष्ठेची असलेली ही पोटनिवडणूक पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी भाजप, काँग्रेस, प्रहार व शिवसेना ठाकरे गट मैदानात उतरले होते. वर्चस्व अबाधित राखण्यासाठी वंचितच्या नेत्या प्रा.अंजली आंबेडकर यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी प्रचाराचा झंझावत सुरू ठेवला. काँग्रेससह इतर पक्षांचे राज्यस्तरावरील नेतेही प्रचार मोहिमेत उतरले होते. वंचितने आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले. प्रतिस्पर्धांना धुळचारत १,३९४ मतांनी मोठा विजय मिळवला. भाजप दुसऱ्या, प्रहार तिसऱ्या, शिवसेना ठाकरे गट चौथ्या, तर काँग्रेस पक्ष पाचव्या स्थानावर घसरला. या माध्यमातून अकोला जिल्हा परिषदेवरील निर्विवाद वर्चस्व वंचितने पुन्हा एकदा सिद्ध केले.

हेही वाचा… मराठा समाजाच्या कुणबी नोंदींच्या दाव्यांवरून वाद

गत दोन दशकाहून अधिक काळापासून अकोला जिल्हा परिषदेचा गड कायम राखणाऱ्या वंचित आघाडीला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा अपेक्षित लाभ होत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे जिल्ह्यात वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय नेते जोमाने कामाला लागले. निवडणुकीसाठी जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणूक लढण्याच्या घोषणेमध्ये ‘वंचित’ने आघाडी घेतली. परंपरागत अकोला लोकसभा मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. १९८४ पासून ॲड.आंबेडकर सातत्याने अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत आहेत. आता २०२४ मध्ये सलग अकराव्यांदा ते येथून आपले नशीब आजमावतील. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वंचित आघाडीने जोरात तयारी सुरू केली. ॲड. प्रकाश आंबेडकर व प्रा.अंजली आंबेडकर यांचे जिल्ह्यात सातत्याने दौरे होत असून विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत मतपेरणी केली जात आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मिळालेले यश लक्षात घेता वंचितची ग्रामीण भागात वीण घट्ट असल्याचे दिसून येते. याचा लाभ ॲड. प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत कितपत होतो? हा मुद्दा वंचित आघाडीसाठी महत्त्वाचा ठरेल, तर पराभव पदरी पडलेल्या भाजप, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला आत्मचिंतन करावे लागणार आहे.

हेही वाचा… रामदास आठवलेंच्या शक्तीप्रदर्शनात सत्तासमृद्धीचे दर्शन

काँग्रेस पक्ष निरर्थक; ‘वंचित’चा निशाणा

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीवरून वंचित आघाडीने काँग्रेसवर निशाणा साधला. अकोल्यात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा निरर्थक ठरला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभा घेऊनही काँग्रेसचा पराभव झाल्याची टीका वंचितने केली. जनतेने एकहाती विजय मिळवून दिला, असा दावा देखील वंचितकडून करण्यात आला आहे.

Story img Loader