अकोला : लोकसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. अकोला मतदारसंघात परंपरागत लढतीमध्ये यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांपुढे भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांच्या पुत्राचे आव्हान पुढे ठाकले आहे. वंचित व ‘मविआ’ एकत्रित येण्याचा निर्णय ‘मुद्द्यां’मध्ये अडकला असून अकोल्यात काँग्रेसच्या भूमिकेवर निवडणुकीचे समीकरण ठरेल. ‘मविआ’सोबत वंचितचा समझोता झाल्यास दुरंगी, अन्यथा पुन्हा एकदा अकोल्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. भाजपने दुसऱ्या यादीत अकोल्यातून खासदार पूत्र अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. साडेतीन दशकांमध्ये लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता भाजपने आपले वर्चस्व अबाधित राखले. लोकसभेच्या गेल्या चार निवडणुकांत तिरंगी लढतीत खा. संजय धोत्रेंनी विजयाची परंपरा कायम ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी त्यांची वर्णी लागली होती. प्रकृती अस्वास्थामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर गेले. त्यामुळे भाजपने त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Dharmarakshak Sambhaji movie, Karad ,
सातारा : ‘धर्मरक्षक संभाजी’ प्रदर्शित करा अन्यथा, दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू; कराडमध्ये सेवाभावी संस्थांचा इशारा
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क

हेही वाचा : राहुल यांच्या भेटीने गांधी कुटुंब-मालेगाव ऋणानुबंधास उजाळा

१९८४ पासून ॲड. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत आहेत. आताही ॲड. आंबेडकरांनी येथून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जोरदार मोर्चेबांधणी केली. भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची चर्चा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत होत असते. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी आघाडी केल्याने अकोल्यातून ॲड. प्रकाश आंबेडकर दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००४, २००९, २०१४ व २०१९ च्या सलग चार लोकसभा निवडणुका ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस स्वबळावर लढल्याने तिरंगी लढतीत खा. संजय धोत्रे यांनी विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. या परंपरागत लढतील यावेळेस बदल झाला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे पिता संजय धोत्रेंऐवजी त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांचे आव्हान राहील. राजकारणात नवखे अनुप धोत्रे निवडणूक रिंगणात पहिल्यांदाच, तर ॲड. आंबेडकर सलग अकराव्यांदा अकोल्यातून आपले नशीब आजमावणार आहेत.

हेही वाचा : बच्‍चू कडूंकडून महायुतीत मिठाचा खडा?

खासदार संजय धोत्रे यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांनाच पक्षाने संधी दिल्यामुळे घराणेशाहीवरून भाजपला टीकेचा देखील सामना करावा लागत आहे. पक्षांतर्गत काही प्रमाणात गटबाजीची डोकेदुखी आहे. गेल्या वेळेस युतीमध्ये शिवसेना ठाकरे गट सोबत होता, आता शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची साथ मिळणार असली तरी ते दोन्ही पक्ष कमकुवत आहेत. मतदारसंघात संघटनात्मकरित्या भाजप मजबूत असून धोत्रे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. उच्चशिक्षित अनुप धोत्रेंसाठी ही जमेची बाजू ठरेल. वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अनुप धोत्रेंना रणनीती आखावी लागणार आहे.

हेही वाचा : अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे चिखलीकरांना निवडणूक सोपी ?

‘मविआ’ व वंचित आघाडीचे अद्याप सूर जुळलेले नाहीत. वंचितने दिलेले मुद्दे व चर्चेअभावी आघाडीची गाडी पुढे सरकली नसल्याचे चित्र आहे. अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची स्वबळावर तयारी सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या इच्छुकांनी देखील मोर्चेबांधणीवर भर दिला. आघाडी न झाल्यास शेवटच्या क्षणी काँग्रेसला आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरावा लागेल. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसने अल्पसंख्यांक उमेदवार दिला होता. आता आघाडी न झाल्यास काँग्रेस कोणता प्रयोग करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहील. भाजप व वंचित आघाडीत तुल्यबळ लढतीचे संकेत असून काँग्रेसच्या भूमिकेनंतर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Story img Loader