अकोला : महाविकास आघाडीमध्ये विशिष्ट जागांवरून सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली. परंपरागतरित्या काँग्रेसने लढून सातत्याने पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाने मोठा डाव टाकला आहे. शिवसेनेच्या पहिल्याच यादीत बाळापूरमधून विद्यमान आमदार नितीन देशमुख, अकोला पूर्व गोपाल दातकर, तर वाशीम मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना ठाकरे गटाचे भाजपपुढे आव्हान राहणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात ओढाताण सुरू होती. त्यामध्ये अकोला पूर्व, अकोट, वाशीम आदी जागांचा समावेश होता. ठाकरे गटाच्या पहिल्याच यादीत बाळापूरसह अकोला पूर्व व वाशीम मतदारसंघातून उमेदवार दिले आहेत. शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत व गुवाहाटी येथे गेलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरेंकडे परतले होते. आता पहिल्याच यादीत त्यांना उमेदवारी दिली. विद्यमान आमदार असल्याने बाळापूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटेल, हे निश्चित होते. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दिन खतीब यांनी वंचितची वाट निवडली. वंचितने त्यांना उमेदवारी देखील दिली. याचा मोठा फटका मविआसह नितीन देशमुख यांना बसण्याची शक्यता आहे. देशमुखांपुढे जागा राखण्याचे आव्हान असेल. बाळापूरमधील प्रमुख दोन उमेदवार जाहीर झाले. महायुतीच्या उमेदवाराची प्रतीक्षा आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : लोकसभेत भाजपचा प्रचार करणाऱ्या जोरगेवारांसाठी मते कशी मागायची ? चंद्रपूर राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेसचा विरोध

आघाडीमध्ये आतापर्यंत अकोला पूर्व मतदारसंघात काँग्रेस लढत आली आहे. मात्र, त्यांना कायम मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. युतीमध्ये परंपरागत २००९ पर्यंत शिवसेना लढल्याने ठाकरे गटाने अकोला पूर्ववर दावा केला. अखेर काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटासाठी हा मतदारसंघ सोडला. ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघातून भाजपने अगोदरच विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना उमेदवारी दिली आहे. अकोला पूर्वमध्ये तिरंगी लढतीची शक्यता असून वंचित कुणाला उमेदवारी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वाशीम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी दिली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. या मतदारसंघात आघाडीमध्ये काँग्रेस लढत होती. काँग्रेसचा कायम पराभव होत असल्याने ठाकरे गटाने त्यावर दावा करून मविआमध्ये ही जागा मिळवली. वाशीममध्ये भाजपचे विद्यमान आमदार असतांना अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. वाशीममध्ये भाजपविरूद्ध शिवसेना ठाकरे गटात लढत होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : पुसद आणि दिग्रसमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! बंजारा समाजाचा उमदेवार दिल्यास समीकरणे बदलणार

बाळापूरमध्ये आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

बाळापूर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. यावेळेस वंचितने मोठी खेळी खेळून काँग्रेसच्या माजी आमदारांना निवडणूक रिंगणात उतरवले. शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान आमदारांना संधी दिली. बाळापूरवर महायुतीमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. भाजपचे जिल्ह्यात शत-प्रतिशतचे लक्ष्य आहे, तर शिंदे गट देखील आग्रही आहे. त्यामुळे महायुतीच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

Story img Loader