Akola West Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक लढण्याची तीव्र महत्त्वकांक्षा ठेऊन तिकिटासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध पक्षांतील अनेक इच्छुकांचा शेवटच्या क्षणी हिरमोड झाला. अखेर त्या नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा हाती घेतला. अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये प्रमुख पक्षांत बंडखोरी झाल्याने महायुती व मविआची डोकेदुखी वाढणार आहे. नेत्यांचे बंड राजकीय समीकरण बदलवणारे ठरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. शेवटच्या काही दिवसांमध्ये अत्यंत वेगवान नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महायुती, मविआसह वंचित आघाडीत देखील उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच बघायला मिळाली. प्रमुख राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न केल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. उमेदवारांचे नाव समोर येताच विविध पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये नाराजी पसरुन बंड होण्यास सुरुवात झाली.

split in Naik family in Pusad, Naik family, Pusad,
पुसदमध्ये नाईक घराण्यात उभी फूट, सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
ubt shiv sena ex city chief amar qatari slap bjp city chief shri ram ganpule in sangamner
शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखांनी भाजपा शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली; नेमके काय घडले ?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तब्बल २९ वर्षे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी भाजपचा झेंडा फडकवत ठेवला. आता या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती. भाजपकडून २२, तर काँग्रेसकडून १८ जण इच्छुक होते. भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना संधी दिली. त्यामुळे पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला. पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तिसऱ्या आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी दाखल केली. माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदानी यांनी देखील भाजपने उमेदवारी न दिल्याने नाराज होऊन अपक्ष म्हणून दंड थोपाटले आहेत. अकोला पश्चिममध्ये व्यापारी, सिंधी समाजाची मतदार संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजपची परंपरागत मतपेढीत विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो.

हेही वाचा – भाजपने भाकरी फिरवली, ‘या’ विद्यमान आमदारांना घरीच बसवले

हेही वाचा – पक्षफुटीनंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला विदर्भात कमी जागा

अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसने भाजपला काट्याची लढत दिली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढला. काँग्रेसने साजिद खान पठाण यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. पठाण यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचे माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पूत्र तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी वंचितची वाट निवडली. वंचित आघाडीकडून ते अकोला पश्चिमच्या रिंगणात उतरले आहेत. दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार मुस्लीम राहिल्याने त्यांच्या गठ्ठा मतांची देखील विभागणी होण्याची दाट शक्यता आहे. अकोला पश्चिममधील बंडखोरीमुळे महायुती व मविआसमोरील अडचणीत वाढ झाल्याची चिन्हे आहेत.

‘कोणता झेंडा घेऊ हाती?’

निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा असताना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. शेवटच्या क्षणी कोणता झेंडा घेऊ हाती? असा प्रश्न इच्छुकांपुढे निर्माण झाला होता. त्याचा सर्वाधिक फायदा वंचित आघाडी व प्रहार पक्षाला झाला. दोन्ही पक्षांकडून अनेक बंडखोर नेत्यांना उमेदवारी देण्यात आली.

Story img Loader