अमरावती : महायुतीचे घटक असूनही प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका घेत असल्याने पेच निर्माण झाला आहे. प्रत्येक मतदार संघात ‘मी खासदार’ हे अभियान राबवून ३०० ते ४०० उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केल्याने भाजपसहित निवडणूक आयोगाचीही चिंता वाढण्याची शक्यता आहे. आमदार बच्चू कडू हे त्यांचे सहकारी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा प्रहारचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते. पण, त्यांना वेळोवेळी मंत्रिपदाने हुलकावणी दिली. अनेकवेळा याविषयीची खंत बच्चू कडू व्यक्त करताना दिसले. अखेर बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद देऊन मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला. बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद वाचविण्यासाठी सरकारने अध्यादेश काढून कडू यांच्याविरोधात दोन वर्षे अविश्वास ठराव आणता येणार नाही अशी तरतूद केल्याचे बोलले गेले. तरीही बच्चू कडू हे समाधानी दिसत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा