अमरावती : शिवसेनेच्‍या शिंदे गटाचे नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ हे खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असा दावा आमदार रवी राणा हे सातत्‍याने करीत असले, तरी अडसूळ हे मागे हटण्‍यास तयार नसल्‍याने अमरावती लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून महायुतीत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राणा दाम्‍पत्‍य हे भाजपसह शिवसेना शिंदे गट, राष्‍ट्रवादी अजित पवार गट, प्रहार जनशक्‍ती पक्ष आणि इतर सहयोगी पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा करीत असले, तरी अद्यापही त्‍यांना अनुकूल प्रतिसाद मिळालेला नाही. महायुतीतील घटक पक्षांच्‍या जिल्‍ह्यातील अनेक नेत्‍यांसोबत यापुर्वी त्‍यांनी कुठल्‍या ना कुठल्‍या कारणाने वाद ओढवून घेतला आहे. आता निवडणुकीत त्‍यांना या नेत्‍यांची साथ हवी आहे. पण, अडसूळ यांचे मन वळवणे आणि इतर स्‍थानिक नेत्‍यांची साथ मिळवणे राणांना शक्‍य होईल का, याविषयी साशंकता व्‍यक्‍त केली जात आहे.

आनंदराव अडसूळ यांनी २००९ ते २०१९ पर्यंत अमरावती लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्‍व केले आहे. गेल्‍या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी त्‍यांचा पराभव केला होता. अडसूळ हे राणा दाम्‍पत्‍याचे कट्टर विरोधक मानले जातात. अडसूळ यांनी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्‍याचा आरोप करीत न्‍यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी पार पडली आणि न्‍यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. दुसरीकडे, निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अडसूळ हे शिंदे गटाचे नेते म्‍हणून महायुतीत सहभागी असले, तरी त्‍यांचे राणांसोबत मतैक्‍य होऊ शकलेले नाही. अमरावती लोकसभा मतदार संघातून महायुतीची उमेदवारी नवनीत राणा यांनाच मिळेल, असा दावा रवी राणा हे सातत्‍याने करीत आहेत. पण, त्‍याचवेळी अडसूळ हे त्‍यांचे दावे खोडून काढत आहेत.

Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Amit Deshmukh On Nana Patole
Amit Deshmukh : विधानसभेतील अपयशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात बदल होणार? ‘या’ नेत्याने स्पष्ट सांगितलं
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
What Ashok Chavan Said About Congress?
Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : दादांचा भाऊ म्हणून अभिमान वाटतो का? अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या….

हेही वाचा : मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपड, भाजपमध्ये धाकधूक

गेल्‍या सहा निवडणुकांमध्‍ये युतीत अमरावतीची जागा ही शिवसेनेकडेच राहिली आहे. भाजप-शिवसेनेची युती अजूनही कायम आहे. अमरावती लोकसभेची जागा ही भाजपकडे कधीही नव्‍हती. ती जागा आमचीच आहे. खरी शिवसेना, शिवसेनचे नाव, पक्षचिन्‍ह सर्वकाही आमच्‍याकडेच आहे. त्‍यामुळे आम्‍ही दावा सोडणार नाही, असे अडसूळ यांचे म्‍हणणे आहे. एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, असा कडवट इशाराच अडसूळ यांनी दिला आहे. लोकसभेसाठी महायुतीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना त्‍यात अमरावतीच्‍या जागेविषयी पेचप्रसंग निर्माण झाला आहे. गेल्‍या निवडणुकीत आनंदराव अडसूळ हे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार होते. तर अपक्ष नवनीत राणा या कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडणूक लढल्‍या. निवडणुकीनंतर त्‍यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. पण, आता महायुतीतील आनंदराव अडसूळ यांनी मतदार संघावर केलेला दावा हा राणा यांच्‍यासाठी अडचणीची बाब ठरली आहे.

हेही वाचा : “निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही”; भाजपा खासदाराची प्रतिज्ञा

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू हे देखील महायुतीचे घटक आहेत. त्‍यांचाही राणांना उघड विरोध आहे. राणांनी बच्‍चू कडू यांच्‍या मतदार संघात जावून केलेली वक्‍तव्‍ये आता त्‍यांच्‍यावरच उलटली आहेत. महायुतीची उमेदवारी नवनीत राणा यांना मिळाली, तरी बच्‍चू कडू यांच्‍याकडून राणांना साथ मिळेल का, हा प्रश्‍न सध्‍या चर्चेत आहे. राष्‍ट्रवादीच्‍या अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांच्‍यासोबत झालेला राणा यांचा यापुर्वी झालेला संघर्ष जनतेच्‍या विस्‍मरणात गेलेला नाही. दुसरीकडे, भाजपचे अनेक स्‍थानिक नेते राणांच्‍या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. हाच धागा पकडून आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांच्‍या उमेदवारीला विरोध करण्‍यासाठी मोहीम उघडली आहे. जिल्‍ह्यातील अनेक नेते त्‍यांना रसद पुरवत असताना नवनीत राणा या महायुतीची उमेदवारी खेचून आणण्यात यशस्‍वी ठरणार का, याचे औत्‍सुक्‍य ताणले गेले आहे.

Story img Loader