अमरावती : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ हे खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असा दावा आमदार रवी राणा हे सातत्याने करीत असले, तरी अडसूळ हे मागे हटण्यास तयार नसल्याने अमरावती लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून महायुतीत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राणा दाम्पत्य हे भाजपसह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, प्रहार जनशक्ती पक्ष आणि इतर सहयोगी पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा करीत असले, तरी अद्यापही त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळालेला नाही. महायुतीतील घटक पक्षांच्या जिल्ह्यातील अनेक नेत्यांसोबत यापुर्वी त्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद ओढवून घेतला आहे. आता निवडणुकीत त्यांना या नेत्यांची साथ हवी आहे. पण, अडसूळ यांचे मन वळवणे आणि इतर स्थानिक नेत्यांची साथ मिळवणे राणांना शक्य होईल का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा