अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या भाजपच्या उमेदवारीला विरोध करून प्रहार जनशक्ती पक्षाने निवडणूक रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेतला असला, तरी ‘प्रहार’च्या समावेशामुळे मतविभागणीचा फायदा भाजप की काँग्रेसला होणार हा प्रश्न चर्चेत आला आहे. अमरावती मतदार संघातून काँग्रेसने सर्वप्रथम बळवंत वानखडे यांची उमेदवारी जाहीर केली. नवनीत राणांना भाजपची उमेदवारी मिळाली. पण, महायुतीचे घटक असलेल्या ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला उघड विरोध केला. त्यापुढे जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना ‘प्रहार’ची उमेदवारी बहाल केली. एकीकडे, महायुतीसाठी ही बंडखोरी ठरली, त्याचवेळी महाविकास आघाडीतूनही बंडाचा झेंडा फडकला. बच्चू कडू हे सध्यातरी महायुतीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला होता, म्हणून आपण गुवाहाटीला गेलो होतो, असे ते सांगतात. भाजपशी अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण, एकाच वेळी अनेकांना वेठीस धरणारे ‘प्रहार’चे हे राजकारण बच्चू कडू यांना कोणता लाभ मिळवून देणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा