मोहन अटाळकर
अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीआधी विद्यमान आमदारांसाठी सत्वपरीक्षा मानल्या गेलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्यातून संमीश्र कौल दिसून आला असला, तरी प्रस्थापित नेत्यांना सुखावणारे हे निकाल आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली, तर भाजप आणि शिंदे गटाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. कॉंग्रेसने या निवडणुकीत १४० सरपंचपदाच्या जागा जिंकल्याचा दावा केला आहे, तर भाजपने १२० जागी वर्चस्व मिळवल्याचे सांगितले आहे. सत्तारूढ आणि विरोधी आघाडीकडून दावे-प्रतिदावे केले जात असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय चित्र राहील, याची चुणूक या निवडणुकीने दाखवून दिली आहे.
जिल्ह्यात भाजपचे एकमेव आमदार प्रताप अडसड हे धामणगाव रेल्वे मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी यशाचा दावा केला असला, तरी कॉंग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी त्यांच्यासमोर या निवडणुकीच्या माध्यमातून आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे, तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाने तिवसा तालुक्यातील ३६ पैकी २५ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकल्याचा दावा केला आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही अचलपूर मतदार संघातील अनेक गावांमध्ये कॉंग्रेसने चांगली कामगिरी केल्याचे म्हटले आहे. पण, कॉंग्रेससमोर प्रहार जनशक्ती, युवा स्वाभिमान यासारख्या छोट्या पक्षांनी अडथळे उभे केले आहेत.
हेही वाचा… विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आंदोलनासाठी स्पर्धा!; विधान भवन परिसरात दोन्ही गट समोरासमोर
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर मतदार संघात आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. राजकुमार पटेल यांनी मेळघाटात शक्ती पणाला लावली. या दोघांना अपेक्षित यशही मिळाले. दुसरीकडे, युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदार संघात वर्चस्व दाखवून दिले. हे तीनही आमदार सत्तारूढ आघाडीत आहेत. त्यांनी आपली शक्ती वाढवणे हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
हेही वाचा… भूखंडावरून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यामागे ठाण्यातील राजकारण ?
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला जिल्ह्यात मात्र चांगली कामगिरी करता आलेली नाही. भाजप आणि शिंदे गटाचे दावे एकत्र केले, तर सरपंच पदाची संख्या ही १५५ च्या पुढे सरकत नाही. माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ या पिता-पुत्रांच्या माध्यमातून शिंदे गटाने जिल्ह्यात पाय रोवण्याचा प्रयत्न चालवला आहे. अडसूळ यांच्या गटासोबत शिवसेनेचा गट असला, तरी त्यांची ताकद ही दर्यापूर, अंजनगाव सूर्जी या दोन तालुक्यांत सीमीत ठरली आहे. जिल्ह्यातील इतर भागात जनाधार मिळवण्यासाठी या गटाला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.
हेही वाचा… केंद्रीय निधीवरून भाजप खासदार-आमदारांमध्येच जुंपली !
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निकट असलेले मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांच्या मतदार संघात आपली पकड मजबूत असल्याचे या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले असले, तरी भाजपनेही त्यांना चांगली लढत दिली आहे. या मतदार संघात भाजपचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आणि जिल्ह्यातील इतर भागात जनाधार वाढविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी बरीच मेहनत करावी लागणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळू शकले नसले, तरी या गटाने आपले परंपरागत गड राखले आहेत.