अमरावती : काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्‍यातील राजकीय वैर सर्वश्रूत असले, तरी निवडणुकीपुर्वी हा संघर्ष वाढला आहे. महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात मंजूर झालेल्‍या कामांच्‍या भूमिपूजनाला देखील बोलावले जात नसल्‍याचे सांगून हिवाळी अधिवेशनात सरकारच्‍या विरोधात हक्‍कभंग दाखल करणार असल्‍याचा इशारा देत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्‍पत्‍यावरही शरसंधान केले आहे.

विकास कामांच्‍या भूमिपूजन, उद्घाटनाच्‍या कार्यक्रमांना स्‍थानिक आमदारांना निमंत्रित करण्‍याचा प्रघात आहे. मात्र, खासदार नवनीत राणा आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राजकीय सूडबुद्धीने वागत असून स्‍थानिक आमदारांना डावलत असल्‍याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
bjp kirit Somaiya
“शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Navneet Rana
Navneet Rana : ‘खुर्च्या फेकल्या, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न…’, अमरावतीमधील प्रचार सभेतील राड्यानंतर नवनीत राणा यांचे गंभीर आरोप
Yashomati Thakur's allegations on Sunil Karhade of NCPSP.
Yashomati Thakur: “शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी,” काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप

हेही वाचा : ‘निवडणूक शिवराज चौहानांची नव्हे, बुधनीच्या जनतेची!’

काही दिवसांपुर्वी दहीहंडीच्‍या कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी गेल्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचाराच्‍या वेळी यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून पैसे घेतले, मात्र काम केले नाही, असा आरोप केला होता. त्‍यावर यशोमती ठाकूर चांगल्‍याच संतापल्‍या होत्‍या. नवनीत राणा ‘जातचोर’ आहेत, आमच्यावरील सिद्ध करून दाखवा, अन्यथा राजकारणातून संन्यास घ्या. आम्ही असे आरोप सहन करणार नाही, असे आव्‍हान यशोमती ठाकूर यांनी दिले होते. आमच्या वडील-आजोबांनी लोकांसाठी जमिनी विकल्या, कुणीही उगाच अफवा पसरवण्याचे काम करू नये. आम्ही नवनीत राणांचा वहिणी म्हणून स्वीकार केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दारोदार फिरलो. पण त्यांचे जात प्रमाणपत्रच खोटे निघाले. त्या स्वतः चोर निघाल्या. त्यामुळे राणांनी मर्यादेत रहावे, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला होता.

राधाकृष्ण विखे पाटील हे जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार होते, तेव्हा यादीत यशोमती ठाकूर यांचेही नाव पाहिले होते. पण, त्यांनी मंत्रिपद मागितले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिपद देण्यास नकार दिला. कोणत्याही अटीविना भाजपमध्ये या, असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले होते, असा दावा आमदार रवी राणा यांनी केल्‍यानंतर राणा दाम्‍पत्‍य आणि यशोमती ठाकूर यांच्‍यात जोरदार आरोप-प्रत्‍यारोप सुरू झाले. यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांची ओळख जिल्‍ह्यातील आक्रमक नेत्‍या अशी आहे. वर्चस्‍वाच्‍या लढाईतून त्‍यांच्‍यात संघर्ष सुरू झाला. यशोमती ठाकूर या तिवसा मतदार संघातून तीन वेळा आमदार म्‍हणून निवडून आल्‍या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्‍ये त्‍यांना मंत्रिपदाची देखील संधी मिळाली होती.

हेही वाचा : ‘महाराष्ट्र मॉडेल वापरून कर्नाटकातील सरकार पडणार’, भाजपाच्या आमदाराचा दावा; आमदारांना ५० कोटी आणि मंत्रीपदाचा प्रस्ताव

२०१९ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर अपक्ष उमेदवार म्‍हणून लढतीत होत्‍या. प्रचारादरम्‍यान काँग्रेसच्‍या नेत्‍यांना नवनीत राणांच्‍या भूमिकेविषयी संशय वाटायला लागला होता. प्रचारादरम्यान नवनीत राणा यांच्याकडून काँग्रेस आघाडीशी प्रामाणिक राहील, अशी शपथ घेण्यास यशोमती ठाकूर यांनी भाग पाडले होते. पण निकालानंतर लगेच नवनीत राणा यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा देऊन आपली दिशा स्‍पष्‍ट केली होती. राणा दाम्‍पत्‍याचे राजकारण संधीसाधू आहे, अशी टीका यशोमती ठाकूर या सातत्‍याने करीत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्‍यात थेट सामना होणार नसला, तरी राणा दाम्‍पत्‍याला आपला राजकारणाचा परीघ विस्‍तारण्‍याची महत्‍वाकांक्षा आहे. जिल्‍ह्यातील प्रत्‍येक नेत्‍यांसोबत त्‍यांचे खटके उडाले आहेत. त्‍यात भाजपच्‍या नेत्‍यांचाही समावेश आहे. राणा दाम्‍पत्‍याने भाजपला पाठिंबा दिला असला, तरी स्‍थानिक भाजप नेत्‍यांसोबत त्‍यांचे फारसे सख्‍य नाही. देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत, असे राणा सातत्‍याने सांगत असतात. देवेंद्र फडणवीस देखील राणांच्‍या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. राणांचा जिल्‍ह्यात एकहाती वर्चस्‍व प्रस्‍थापित करण्‍याचा प्रयत्‍न आहे. त्‍यातून संघर्षाचे प्रसंग पुन्‍हा-पुन्‍हा येत आहेत.

हेही वाचा : सरसंघचालक भागवत यांचे केरळमध्ये इंग्रजीत भाषण; संघाचा इंग्रजीद्वेष मावळण्यामागे कारण काय?

“महाविकास आघाडी सकारच्या कार्यकाळात जी विकास कामे मंजूर झाली, त्या कामांना स्थगिती देण्यात आली. त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली होती. निकाल आमच्या बाजूने लागला, पण शिंदे-फडणवीस सरकार केवळ राजकीय सुडबुद्धीने स्थानिक आमदारांना डावलत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार नवनीत राणा यांचे हे कटकारस्थान आहे. सरकार आणि बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्‍या विरोधात आपण हक्कभंग दाखल करणार आहोत” -यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा.