अमरावती : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्‍यक्ष संजय खोडके हे महायुतीत असले, तरी त्‍यांनी भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍याशी असहकार पुकारल्‍याने गेल्‍या दोन दशकांतील राजकीय वैरत्‍वाचा दुसरा अंक सुरू झाला आहे.

नवनीत राणा यांच्‍या प्रचार फलकांवर संजय खोडके यांचे छायाचित्र लावण्‍यात आले होते. त्‍यावर आक्षेप घेत आपल्‍या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करू नये, अशी तंबी देऊन खोडके यांनी राणांना विरोध कायम असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. फलकांवरील तसेच पत्रकांवरील छायाचित्र न हटविल्‍यास कायदेशीर कारवाई करण्‍याचा इशारा खोडके यांनी दिल्‍याने राणा दाम्‍पत्‍य आणि संजय खोडके यांच्‍यातील वितुष्‍ट कोणत्‍या वळणावर आहे, याचा अंदाज राजकीय निरीक्षकांना आला आहे.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा… यवतमाळ- वाशिममध्ये महायुतीच्या उमेदवारीचा संभ्रम कायम

उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍यानंतर त्‍यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे संजय खोडके हे त्‍यांच्‍यासमवेत गेले. संजय खोडके यांचे जिल्‍ह्यातील राजकारणात स्‍वतंत्र अस्तित्‍व आहे. बडनेराचे आमदार रवी राणा आणि संजय खोडके यांच्‍यातील राजकीय वितुष्‍ट हे जगजाहीर आहे. तरीही दोघे नेते महायुतीत असल्‍याने त्‍यांच्‍यातील अंतर कमी झाल्‍याचे मध्‍यंतरीच्‍या काळात बोलले जाऊ लागले. पण, नवीन घटनाक्रमामुळे विस्‍तव अजून कायम असल्‍याचे संकेत मिळाले आहेत.

सुमारे दहा वर्षांपुर्वी २०१४ च्‍या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या विरोधात उघड भूमिका घेतल्‍याने संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली होती. खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके यांना पराभूत करून रवी राणा हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राणा यांनी राष्ट्रवादीशी मैत्री केली. मात्र, खोडके आणि राणा यांच्यात वैर कायम होते. त्यात नवनीत राणा कौर यांना उमेदवारी मिळाल्याने खोडके नाराज झाले. नवनीत राणा यांचा प्रचार न करण्याची ठाम भूमिकाही खोडके गटाने घेतली होती. त्‍यानंतर खोडके यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता. २०१८ मध्‍ये खोडके हे स्‍वगृही परतले.

हेही वाचा… पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक

आता अजित पवार गट महायुतीत असला, संजय खोडके आणि रवी राणा यांच्‍यात मतैक्‍य होऊ शकलेले नाही. नवनीत राणा यांच्‍या प्रचारासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या फलकांवर संजय खोडके यांचे छायाचित्र झळकताच खोडके यांनी आक्षेप घेतला. काही दिवसांपुर्वी राणा आपल्‍या भेटीसाठी आले होते. त्‍यावेळी आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही आणि विरोधातही कुठे बोलणार नाही, असे आपण त्‍यांना स्‍पष्‍ट सांगितले होते. तरीही आता त्‍यांनी प्रचारासाठी आपल्‍या छायाचित्राचा वापर करणे चुकीचे आहे. राष्‍ट्रवादीचे नेते प्रफुल्‍ल पटेल यांच्‍यासोबत देखील या विषयावर आपण स्‍पष्‍टपणे बोललो असल्‍याचे संजय खोडके यांचे म्‍हणणे आहे.

एकीकडे, महायुतीतील प्रहार जनशक्‍ती पक्षाने नवनीत राणा यांच्‍या विरोधात निवडणूक‍ लढण्‍याचा निर्णय घेतला आहे. बच्‍चू कडू हे उघडपणे राणा यांच्‍या विरोधात उभे ठाकले आहेत. प्रहारचे उमेदवार दिनेश बु‍ब हे राणांविरूद्ध लढत देणार आहेत. अशा स्थितीत संजय खोडके यांचे असहकार्य हे नवनीत राणा यांच्‍यासाठी अडचणीचे ठरण्‍याची शक्‍यता आहे.

Story img Loader